
विटा : ‘बदनामी का करतोस,’ या कारणावरून गलाई व्यावसायिकास दोघांना मारहाण करून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सात जणांविरोधात विटा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. अविनाश जाधव (शेळकबाव, ता. कडेगाव), तुषार धनाजी मदने (हिंगणगादे, ता. खानापूर), आतिष बोडरे (गार्डी, ता. खानापूर ) व चार अनोळखी या सातजणांवर गुन्हा नोंद झाला. संदीप तुकाराम साळुंखे (वय ३४, मूळ हिंगणगादे, ता. खानापूर; सध्या होलीचकला मेन बझार फत्तेपुरा, जि. दाहोद, गुजरात) या गलाई व्यावसायिकाने विटा पोलिसांत फिर्याद दिली.