विट्यात यंत्रमागाची धडधड आणखी एक आठवडा बंद - किरण तारळेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

विटा - देशभर जीएसटी लागू झाला. मात्र वस्त्रोद्योग साखळीतील ठोक व किरकोळ कापड व्यापाऱ्यानी अद्याप जीएसटीसह कापड खरेदीसाठी थांबा आणि पाहा, असे धोरण घेतलेले आहे. त्यामुळे यंत्रमाग बंदचा निर्णय कायम ठेवत आणखी आठवडाभरासाठी विट्यातील सर्व यंत्रमाग बंद ठेवून कापड उत्पादन थांबविण्याचा निर्णय आज (ता. ११) झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत झाल्याची माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली.

तारळेकर म्हणाले, ‘‘यंत्रमागधारकांचा बंद जीएसटी विरोधात नाही तर या कराच्या अंमलबजावणीसाठी आणि कापूस ते तयार कापड या साखळीतील सर्व घटकांमध्ये असणारी कराबद्दलची भीती दूर होऊन जीएसटीच्या माध्यमातून व्यापार सुरू करण्याच्या तयारीसाठी लागणाऱ्या कालावधी दरम्यान यंत्रमागधारकांच्याकडचा कापडसाठा वाढू नये व पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात ४ जुलैपासून  शहरातील सर्व यंत्रमाग बंद ठेवून कापड उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावर पुढील निर्णय घेण्यासाठी आज (ता.११) शहरातील सर्व यंत्रमागधारकांची विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात महत्त्वाची बैठक झाली. 

ते म्हणाले वस्त्रोद्योग साखळीतील ठोक व किरकोळ कापड व्यापाऱ्यानी अद्याप जीएसटीसह कापड खरेदीसाठी थांबा आणि पाहा, असे धोरण घेतलेले आहे. 

जीएसटी रद्दची अफवा
बाजारपेठेत सध्या एकंदर सुस्त परिस्थिती आहे. सुरत आणि अहमदाबादमधील जीएसटी विरोधी आंदोलनामुळे कापडावरील जीएसटी रद्द होणार असल्याची चर्चा व अफवा पसरली आहे. त्यामुळे थोडीफार सुरू झालेली बाजारातील कापड खरेदी पुन्हा थांबण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Web Title: vita sangli news machineloom one week close