'ती' भावाला भेटण्यासाठी माहेरी आली अन् पाहताच केला आक्रोश :Belguam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

'ती' भावाला भेटण्यासाठी माहेरी आली अन् पाहताच केला आक्रोश

बेळगाव : भावाला भेटण्यासाठी माहेरी आलेल्या बहिणीला दुर्दैवाने फासावर लटकलेला भावाचा चेहरा पाहावयास मिळाला. शुक्रवार (ता. १२) मच्छे येथे ही घटना घडली असून, विठ्ठल गंगापप्पा मऱ्याण्णावर (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांतून समजली अधिक माहिती अशी, विठ्ठल हा उद्यमबाग येथे औद्योगिक वसाहतीत कामाला जात होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो मानसिक अस्वस्थ देखील बनला होता. आज दुसऱ्या कामाच्या शोधार्त तो घराबाहेर पडला होता.

दुपारच्या दरम्यान पुन्हा घरी आला व मी माडीवर जोपी जातो असे पत्नीला सांगून माडीवर गेला होता. यावेळी बहीण भाऊ विठ्ठल याला भेटण्यासाठी माहेरी आली. घरात प्रवेश केल्यानंतर तिने वहिनी विठ्ठल कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर ते वरती झोपी गेले आहेत असे पत्नीने सांगितले.

हेही वाचा: तिळ्यांना जन्म देताच तिचा झाला मृत्यू ; 4 डॉक्टरांना नोटीस

वरच्या मजल्यावर भावाला भेटण्यासाठी गेलेल्या बहिणीला आपला भाऊ फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे तिने एकच आक्रोश केला. आत्महत्येची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील शव आगारात शल्यचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

loading image
go to top