'लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाचा हक्क बजावा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

कोल्हापूर - भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने त्यांना मिळालेला मतदानाचा पवित्र हक्क 100 टक्के बजावावा, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित मतदार जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदिवडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व्यासपीठावर होते.

लोकशाहीने नागरिकांना दिलेला मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे स्पष्ट करून श्री. नांगरे-पाटील म्हणाले, ""लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला गती निर्माण होते. मतदानाची सुटी ही एन्जॉय करण्यासाठी नसून ती राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आहे, याची जाण ठेवून प्रत्येकाने मतदान करून भारतीय लोकशाही समृद्ध आणि बलशाली करण्यास सक्रिय व्हावे. परिवर्तनाची सुरवात स्वत: मतदान करून करा व इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा.''

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, ""मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरू असून 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकानेच आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे.'' उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र खाडे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. कोगे येथील न्यू हायस्कूलची विद्यार्थिनी प्राची निकम हिने "भारतीय मतदार जागृत आहे का' या विषयावर भाषण केले. प्रांताधिकारी सचिन इथापे यानी आभार मानले.

अपडेट घर बसल्या...
मतदारांसाठी निवडणूक आयोगाने COP हे ऍप्लिकेशन आणले असून त्याचा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये वापर केला जाणार आहे. याबरोबरच TRUE Voters APPLICATION आणले असून त्यामुळे मतदारांचे नाव, मतदान केंद्र आदी माहिती मतदारांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा जिल्ह्यातील मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी केले.

Web Title: Voter awareness programs