esakal | Vidhan Sabha 2019 : मतदाराच परिवर्तन घडवू शकतात : सिन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : मतदाराच परिवर्तन घडवू शकतात : सिन्हा

महागाई, बेरोजगारी आणि भूकबळी यांसारखे अनेक मोठे प्रश्न देशासमोर असताना मोदी सरकारकडून जम्मू-काश्‍मीरमधून 370 कलम हटविल्याच्या गोष्टी केल्या जात आहेत.

Vidhan Sabha 2019 : मतदाराच परिवर्तन घडवू शकतात : सिन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : "महागाई, बेरोजगारी आणि भूकबळी यांसारखे अनेक मोठे प्रश्न देशासमोर असताना मोदी सरकारकडून जम्मू-काश्‍मीरमधून 370 कलम हटविल्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. मात्र, मतदारांमध्ये मोठी शक्ती असल्याने तेच परिवर्तन घडू शकतात'', असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. 

सोलापूर शहर मध्यमधील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे, दक्षिण सोलापूर मतदारसंघातील उमेदवार बाबा मिस्त्री व शहर उत्तरमधील मनोहर सपाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर यू .एन .बेरिया, संजय हेमगडडी, मनपा गटनेते चेतन नरोटे उपस्थित होते. . 

"बहोत जान है इस सभा मे...' उशी सुरवात करीत सिन्हा यांनी आपल्या पंधरा मिनिटांच्या भाषणात भाजप सरकारच्या निराशाजनक कामगिरीचा आढावा घेतला. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाला मोठा आर्थिक फटका बसला. उपस्थित गर्दी पाहून , ही निवडणूक सभा नाही तर विजयी सभा आहे, असा उल्लेख त्यांनी केला. 

सिन्हा पुढे म्हणाले, "सरकारला बेरोजगारीचा प्रश्न विचारला तर सरकार 370 कलम हटविण्याचे सांगते. नोटाबंदी आणि जीएसटीसारखा चुकीचा निर्णय सरकारने घेतल्याने आज देशातील उद्योगधंदे देशोधडीला लागले आहेत. महागाईने उच्चांक गाठला आहे. जीएसटीमुळे चार्टर्ड अकौंटंटचा फायदा झाला आहे. भाजप सरकारकडून मोठ-मोठ्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी भूकबळीमध्ये भारत जगात 102 व्या स्थानी असल्याची आकडेवारी हंगर इंडेक्‍समधून नुकतीच समोर आली आहे. या खालोखाल पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आदी देशांचा समावेश आहे.

तसेच जीएसटी आणि नोटाबंदीमुळे देशातील कारखाने बंद पडल्याने तीन लाख लोक बेकार झाले असून, देशात सर्व काही आलबेल नसल्याचेच हे चित्र आहे, यावेळी तिन्ही उमेदवारांनीही मनोगत व्यक्त केले.