तासगाव पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अतिशांततेत मतदान ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

तासगाव - तासगाव नगरपालिका प्रभाग सहा अ मधील पोटनिवडणुाकीसाठी आज अभूतपूर्व शांततेत मतदान झाले. शहरातील निवडणुकांचा इतिहास पाहता ना गोंधळ, ना केंद्रावर गडबड, ना लगबग, ना अरेरावी आणि दहशत नाही अशी ही पहिलीच निवडणूक. निर्भय वातावरणात तब्बल 59 टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. प्रचारा दरम्यान, पोलिसांना झालेली मारहाण, शांततेत मतदान झाल्याने पोटनिवडणुकीने इतिहास घडवला हे नक्‍की. 

गेल्या काही वर्षात तासगाव तालुक्‍यातील निवडणुकांचा इतिहास रक्‍तरंजित राहिला. बाजार समिती असो, की विधानसभा प्रत्येक निवडणुकीत मारामारी ठरलेली असे. या पोटनिवडणुकीची पार्श्‍वभूमीही तशीच संघर्षाची. जातीच्या दाखल्यावरून राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे सदस्यपद भाजपाने तक्रार करून घालवले. गंमत म्हणजे याच प्रभागातील पूर्वीच्या नगरसेविकेचे सदस्यपदही भाजपाने तक्रार करूनच घालवले. शिवाय प्रभागात तीन-चार निवडणुकांत मतदानादिवशी शेवटच्या तासात हाणामारी ठरलेली. त्यात पोटनिवडणुकीत धक्‍काबुक्‍की, मारामारीच्या पुढे पाउल टाकत निवडणुक वादातून भाजपा कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला केला. पोलिस उपनिरीक्षकासह पाचजण जखमी झाल्याने पोटनिवडणूक राज्यपातळीवर गाजली. भाजपाच्या 70 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 

त्यामुळे आजच्या मतदान प्रक्रियेकडे शहराचे लक्ष लागले. ज्या चौकात सलग तीन निवडणुकांत हाणामा-या झाल्या तो चौक आज कमालीचा शांत होता. केंद्रांवर तर निरव शांतता होती. चार पैकी दोन केंद्रावर तर मतदानप्रतिनिधीही नव्हते. शुकशुकाट असलेल्या केंद्रावर अधिकारी, बंदोबस्तावर असलेले पोलिस गप्पा मारत होते. शेवटच्या तासात झालेली गजबज तेवढीच चौकाने अनुभवली. काही असो पोलिसांना झालेली मारहाण आणि अतिशांततेत झालेली निवडणूक तासगावच्या राजकीय इतिहासात नोंदवली गेली हे नक्‍की. 

Web Title: Voting for the first time in the history of Tasgaon Municipa