मोबाईल ऍप्सने आठ लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

वाई - खात्यात रक्कम शिल्लक नसताना मोबाईल अप्लिकेशनद्वारे आठ लाख रुपयांची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर जमा करून बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी वाई पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल झाला. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वाई शाखेत हा प्रकार घडला. 

वाई - खात्यात रक्कम शिल्लक नसताना मोबाईल अप्लिकेशनद्वारे आठ लाख रुपयांची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर जमा करून बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी वाई पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल झाला. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वाई शाखेत हा प्रकार घडला. 

बॅंकेच्या शाखा प्रबंधकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पूजा रवींद्र गायकवाड, रवींद्र नारायण गायकवाड (दोघेही रा. फणसेवाडी, नांदगणे- वयगाव, ता. वाई), राजेश बुधखले, सुप्रिया ठोमसे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशा चौघांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलिस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वाई शाखेचे प्रबंधक सुनील वानखेडे यांनी तक्रार दिली. बॅंकेने युनिफाईट पेमेंन्ट इन्टरफ (युपीआय) या नावाचे मोबाईल ऍप्स सुरू केले आहे. या ऍप्समध्ये पैसे हस्तांतरण करण्यासाठी रक्कम पाठविणे व रक्कम मागविणे असे दोन पर्याय आहेत. त्यावरून ग्राहक एक लाख रुपयापर्यंत रक्कम पाठवू शकतो. बॅंकेच्या शाखेत काही ग्राहकांची अशी खाती आहेत, की ते युपीआय मोबाईल ऍप्सचा वापर करतात. या मोबाईल ऍप्सद्वारे ता. 13 ते 18 जानेवारी 2017 या कालावधीत पूजा गायकवाड व रवींद्र गायकवाड या दोघांच्या खात्यात रक्कम उपलब्ध नसतानाही खात्यातून आठ लाख रुपये ऍक्‍सिस बॅंकेच्या बुलठाणा व चाकण शाखेचे खातेधारक राजेश बुधखले व सुप्रिया गजानन ठोमसे यांच्या खात्यावर रिस्वेस्ट स्वीकारून जमा केल्याचे निदर्शनास आले. या चौघांनी आपापसात संगनमत करून पूजा गायकवाड व रवींद्र गायकवाड यांच्या खात्यात रक्कम शिल्लक नसताना मोबाईल ऍप्सद्वारे बॅंकेची आर्थिक फसवणूक केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक विनायक वेताळ तपास करीत आहेत. 

"युपीआय' मोबाईल ऍप्समधून फसवणूक 
महाराष्ट्र बॅंकेने युनिफाईट पेमेंन्ट इन्टरफ (युपीआय) या नावाचे मोबाईल ऍप्स सुरू केले आहे. हे ऍप्स मे. मेसर्स इन्फ्रोसॉफ्ट टेक्‍नॉलाजी प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून घेतले आहे. कोणत्याही बॅंकेच्या ग्राहकाला इंटरनेटवरून हे ऍप्स डाऊनलोड करता येते. या ऍप्समध्ये पैसे हस्तांतरण करण्यासाठी रक्कम पाठविणे व रक्कम मागविणे असे दोन पर्याय आहेत. त्यावरून ग्राहक एक लाख रुपयापर्यंत रक्कम पाठवू शकतो. बॅंकेच्या शाखेत काही ग्राहकांची अशी खाती आहेत, की ते युपीआय मोबाईल ऍप्सचा वापर करतात.

Web Title: wai news mobile app crime