वाई शहराची अस्मिता पुसण्याचा शासनाचा डाव ?

Marathi Encyclopedia Office Wai
Marathi Encyclopedia Office Wai
Updated on

सातारा ः मराठी भाषा प्रगल्भतेसाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून आणि माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून वाई येथे विश्वकोश खंडाचे काम सन 1960 कालावधीत सुरु झाले. या विश्वकोशाचे काम गेली अनेक वर्ष वाईतून सुरु आहे. सध्याचे असणारे येथील कार्यालय पुणे येथे हलविण्याचा राज्य शासनाचा विचार सुरु आहे.

हेही वाचा - Video राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत तमिळनाडू, छत्तीसगड, महाराष्ट्र अव्वल

त्यामुळे वाईकरांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत विश्वकोश कार्यालयात पुर्वी कार्यरत असलेले अभ्यागत संपादक राजाराम अनपट म्हणाले पुर्वाश्रमीचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्यासह देशातील नामवंत साहित्यिकांनी विश्वकोश कार्यालयास वेळोवेळी भेटी दिल्या आहेत.

अवश्य वाचा -  कडेकोट किल्ल्यामधून बाहेर पडू या !

सध्या देखील येथे अनेक साहित्यिक व तज्ञ भेट देत असतात. येथून विश्वकाेशाचे खंड निर्माण हाेतात. त्यामुळे वाई शहर संपूर्ण देश व जगाच्या पाठीवर नावाजले गेले आहे.

हे कार्यालय पुण्याला नेल्यास वाई शहराची ओळख व अस्मिता पुसली जाईल अशी भावना वाईकरांची आहे. हे कार्यालय वाई शहरातून पुणे येथे हलवू नये यासाठी आज (रविवार) वाईकरांनी मधली आळी येथील भगवा कट्टा सभागृहात सायंकाळी साडे सात वाजता बैठक आयोजित केली आहे.

हेही वाचा -  ​Video श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा पालखी साेहळा निघाला श्रीरामाच्या भेटीला

यापुर्वी देखील विश्वकोश कार्यालयाचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यास कडाडून विरोध झाला. आता पून्हा आजच्या बैठकीत हे कार्यालय अन्यत्र नेले जाऊ नये यासाठी पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Tiger Reserve tiger conservation project
Warana River water discharge news
bhuinj police arrest pickup gang involved in cattle theft in wai satara district
Kelghar Ghat Landslide
Marathi News Esakal
www.esakal.com