विश्वकोश कार्यालयसाठी वाईकरांचा आज एल्गार

Encyclopedia Office In Wai
Encyclopedia Office In Wai

वाई : शहराची सांस्कृतिक ओळख व वैभव असणारे मराठी विश्‍वकोशाचे कार्यालय पुणे येथे हलविण्यात येणार असल्याने वाईकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. दरम्यान विश्वकोश कार्यालय अन्यत्र हलविण्याचा प्रस्ताव नसल्याचे विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे सहायक सचिवांनी सांगितले.

हेही वाचा - सातारकरांच्या दातांच्या काळजीसाठी आता सिव्हीलमध्ये आधूनिक डेंटल चेअर
 
मराठी भाषा प्रगल्भतेसाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्राचे शिल्पकार तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सन 1960 मध्ये वाईत मराठी विश्वकोश खंडांच्या निर्मितीचे काम सुरू झाले. तेव्हापासून जागतिक विश्वकोशाच्या धर्तीवर मराठी विश्वकोश खंडांच्या निर्मितीचे काम अव्याहतपणे वाईत सुरू आहे.

पूर्वाश्रमीचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्यासह देशातील नामवंत साहित्यिक, विविध भाषांच्या विद्वानांनी, अभ्यासकांनी वेळोवेळी या कार्यालयास भेटी दिल्या आहेत. आजही अनेक साहित्यिक व तज्ज्ञ याठिकाणी भेट देत असतात. येथूनच विश्वकोश खंडांच्या नोंदी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. यामुळे वाई शहराची वेगळी ओळख जगाच्या पाठीवर पोचली आहे. सध्या विश्वकोशाचे कार्यालय प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या मालकीच्या इमारतीत आहे. परंतु, येथील कार्यालय पुणे अथवा मुंबई येथे हलविण्याची चर्चा मराठी भाषा विभागात सचिव स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. याबाबतची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.
 
विश्वकोश कार्यालयाचे स्थलांतर नकाे...

विश्वकाेश कार्यालय अन्यत्र हलविल्यास वाई शहराची सांस्कृतिक ओळख व अस्मिता पुसली जाईल, अशी भावना वाईकरांची आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ मधली आळी भगवा कट्टा येथील सभागृहात बैठक बोलाविण्यात आली हाेती. या बैठकीत सुमारे 30 तेे 40 वाईकर उपस्थित हाेते. यामध्ये साहित्यिक, पत्रकार, नागरीकांचा समावेश हाेता. या बैठकीत हे कार्यालय अन्यत्र हलविण्यात येऊ नये, यासाठी पुढील रूपरेषा ठरविण्यात आली. आज (साेमवार) दुपारनंतर संबंधित अधिकारी यांना वाईकरांच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे.

अवश्य वाचा ः #MondayMotivation एकीचे बळ

""विश्‍वकोश कार्यालय वाईतून हलविण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही. याबाबत गैरसमजातून चुकीची माहिती पसरविण्याचे काम होत आहे. प्राज्ञपाठशाळा अथवा शासकीय मुद्रणालय जागेच्या परिसरात विश्वकोश कार्यालयासाठी तर्कतीर्थांच्या नावाने प्रशस्त नियोजित इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठीचा निधी मंजूर आहे. मात्र, काही कारणास्तव हा प्रस्ताव प्रलंबित आहे. तो मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.'' 

डॉ. शामकांत देवरे, सहायक सचिव, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com