वाढीव दराची शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

सोलापूर - राज्यातील दूध उत्पादकांना बुधवार(1 ऑगस्ट)पासून प्रतिलिटर 25 रुपयांचा दर मिळेल, असे शासनाने जाहीर केले. मात्र 20 जुलै रोजी शासनाने काढलेल्या निर्णयातील त्रुटी दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दूध दराची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर सरकारने गायीच्या दूध दरात पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पावडर निर्मिती प्रकल्पांना केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहे. मात्र, सद्यस्थितीत राज्यात साडेतीन लाख मेट्रिक टन दूध भुकटी शिल्लक असून त्यासाठी राज्य सरकारने 50 रुपयांचे अनुदान जाहीर करावे आणि त्याचा शासन निर्णय काढावा, त्यानंतर पुढील आठ दिवसांत वाढीव दराची अंमलबजावणी केली जाईल, असा इशारा खासगी संघांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली. राज्य सरकारच्या 3.5 आणि 8.5 च्या फॅटऐवजी 3.2 आणि 8.3 करण्याचा विचार राज्य सरकारचा असल्याचेही सांगण्यात आले. 

राज्य सरकारच्या निर्देशानुसार दूध उत्पादकांना प्रतिलिटर 25 रुपयांचा दर देणे खासगी व सहकारी दूध संघांना बंधनकारक राहणार आहे. सध्या दूध उत्पादकांची व एकूण संकलनाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. 
- सुनील शिरापूरकर, विभागीय उपनिबंधक, दुग्ध 

राज्यातील दुधाची सद्यःस्थिती 
एकूण दूध संकलन  - 1.34 कोटी लिटर 
पॅकिंगद्वारे विक्री  - 47.28 लाख लिटर 
भुकटीसाठी दूध  - 37.69 लाख लिटर 
दुग्धजन्य पदार्थ - 16.33 लाख लिटर 

Web Title: Wait for the increased milk rate to farmers