प्रतिक्षाची जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी निवड 

सुनील शेडगे
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

नागठाणे - प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत, दारिद्याशी दोन हात करत, डोंगरपायथ्याच्या गावात वाढलेल्या प्रतिक्षाची जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यातून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नागठाणे - प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत, दारिद्याशी दोन हात करत, डोंगरपायथ्याच्या गावात वाढलेल्या प्रतिक्षाची जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यातून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

प्रतिक्षा लक्ष्मण मोरे ही सातारा तालुक्यातील कारी गावची. सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या खेड्यातील. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत तिने मल्लखांब या खेळात प्रावीण्य संपादले आहे. अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. आजवर
सहा राष्ट्रीय स्पर्धांतून तिने सहा सुवर्ण अन् चार रौप्यपदकांची कमाई केली आहे. सध्या ती कला शाखेच्या दुसऱ्या  वर्षात शिकते. वयाच्या सातव्या वर्षांपासून मल्लखांबाचा प्रारंभ करत गेली तेरा वर्षे ती सातत्याने सराव, मेहनत करत आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माया मोहिते या तिच्या मार्गदर्शक. तिची मोठी बहीणदेखील राष्ट्रीय मल्लखांबपटू आहे. आई- वडील शेती करतात.

समोर प्रश्नच प्रश्न, अशा स्थितीत तिने भारतीय संघात स्थान मिळविले आहे.  उल्लेखनीय म्हणजे, संपूर्ण देशातून केवळ सहा खेळाडू निवडण्यात आले असून, त्यात प्रतिक्षाचा समावेश आहे.

विश्वचषक स्पर्धेस 16 फेब्रुवारीस मुंबईत प्रारंभ होणार आहे. ही पहिलीवहिली स्पर्धा आहे. त्यात भारतासह अमेरिका, इटली, मलेशिया, इंग्लंड, फ्रान्स, जपान, जर्मनी आदी देशांतील सुमारे दीडशे पुरुष, महिला खेळाडू सहभागी होणार आहेत.

Web Title: Waiting for World's Mall of the Olympics