वाळवा तालुका विद्यार्थी संघटनेचा प्राद्यापक आंदोलनास पाठींबा

वाळवा तालुका विद्यार्थी संघटनेचा प्राद्यापक आंदोलनास पाठींबा

इस्लामपूर - प्राध्यापकांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज वाळवा तालुका महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात तालुक्‍यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

निवेदनात म्हटले आहे की, "राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे विविध मागण्यांसाठी 25 सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन सुरु करण्यापूर्वी तीन महिने आधी आंदोलनाची पूर्वकल्पना एमफुक्‍टो या राज्यस्तरावरच्या प्राध्यापकांच्या संघटनेने आपणास दिली होती. त्याकडे वेळीच लक्ष दिले असते तर प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे आमचे शैक्षणिक नुकसान टाळता आले असते. प्राध्यापकांच्या मागण्या न्याय्य आहेत. विद्यार्थी म्हणून आमचा या मागण्यांना पूर्ण पाठिंबा आहे. हे आंदोलन अचानक सुरु केलेले नाही. राज्य सरकारने या आंदोलनाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. काही दिवसात विद्यापीठ परीक्षा सुरु होणार आहेत. त्यासाठी अभ्यासक्रम शिकवून संपण्यासाठी हा संप मिटणे आवश्‍यक आहे. यासाठी सरकारने तातडीने लक्ष घालून प्राध्यापकांच्या आंदोलनाबाबत योग्य तो तोडगा काढावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्यांच्या रकमामध्ये काळानुरुप वाढ झाली पाहिजे आणि या रकमा शैक्षणिक वर्षाच्या आरंभालाच विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com