पाणी प्रश्नावरून शाहुवाडी पंचायत समिती सदस्याचा सभात्याग

पाणी प्रश्नावरून शाहुवाडी पंचायत समिती सदस्याचा सभात्याग

शाहूवाडी - शाहूवाडी पंचायत समिती कार्यालयात गेली २५ दिवस पाणी नाही. वारंवार सांगूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केल्याने आज सर्व सदस्य प्रशासनाचा निषेध करत  मासिक सभेतून बाहेर पडले .

येथील पंचायत समितीत आज मासिक सभा होती. मागील सभेचे अहवाल वाचन सुरु असतानाच सदस्य दिलीप पाटील यांनी आदी पंचायत समिती कार्यालयातील पाण्याचे काय झाले ते सांगा असा प्रश्न विचारला. यावर प्रशासन निरुतर झाले. थातूरमातूर उत्तर देऊ लागले. त्यावर उपसभापती पांडूरंग पाटील, सदस्य डॉ. स्नेहा जाधव, विजय खोत अधिक आक्रमक झाले. अखेर अवघ्या दहा मिनिटात प्रशासनाचा निषेध करत सर्व सदस्यांनी सभागृह सोडले. 

पंचायत समितीला पाणीपुरवठा करणारी पाणीसाठा टाकी इमारतीच्या छतावर आहे. त्या ठिकाणी पाईप खराब झाली  असल्याने टाकीत पाणी आहे, पण इमारतीत वापरायला पाणी नाही अशी अवस्था झाली आहे. कार्यालयातील मुताऱ्या, शौचालय त्यामुळे कुलूपबंद राहिली. खराब पाईप बदला आणि पाणी सुरु करा अशी सदस्यांची मागणी होती. पण तिथे मधमाशांचे पोळे असल्याने ही पाईप बदलता येत नसतेचे कारण पुढे करत प्रशासनाने २५ दिवस घालवले. त्यामुळे आज सभेच्या सुरुवातीलाच पाणी प्रश्नावरुन सर्वच सदस्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संतप्त भावना व्यक्त करून प्रशासनाचा निषेध करत सभागृह सोडले .

सभापती आश्विनी पाटील, उपसभापती पांडूरंग पाटील, सदस्य डॉ . स्नेहा जाधव, दिलीप पाटील, विजय खोत, सुनिता पारळे, अमरसिंह खोत आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com