Night-Only Power Supply Puts
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Leopard : ऊसामध्ये वाढलेला बिबट्यांचा वावर आणि महावितरणचा रात्रीचा वीज पुरवठा; शेतकरी अक्षरशः जीव मुठीत धरून शेतात
Night-Only Power Supply Puts : महावितरणकडून शेतीपंपांना रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंतच वीजपुरवठा केल्याने शेतकऱ्यांना वाढत्या बिबट्या व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या धोक्यात जीव टाकून शेतात काम करावे लागत आहे.
ईश्वरपूर : महावितरण कंपनीच्या अजब कारभारामुळे वाळवा तालुक्यातील काही गावांमधील शेती क्षेत्रांमध्ये अद्यापही रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंतच वीजपुरवठा केला जात आहे. बिबट्या, सरपटणारे प्राणी आणि इतर वन्य जीव यांच्या धोक्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे.

