वांगी बनले खिंडारमुक्त गाव...पडकी, जुनी घरे पाडून सपाटीकरण 

रवींद्र मोहिते 
Monday, 27 July 2020

वांगी (सांगली)-  वांगी (ता.कडेगांव) येथील ग्रामपंचायतीने गावातील जूनाट व पडकी घरे सपाट करुन मोठमोठे खड्डे बूजवून संपूर्ण गांव खिंडारमूक्त केले आहे. अशाप्रकारे गावठानातील सुमारे 15 एकर जागा वापरण्यायोग्य बनवून ग्रामपंचायतीने इतर गावांपुढे आदर्श ठेवला आहे. 

वांगी (सांगली)-  वांगी (ता.कडेगांव) येथील ग्रामपंचायतीने गावातील जूनाट व पडकी घरे सपाट करुन मोठमोठे खड्डे बूजवून संपूर्ण गांव खिंडारमूक्त केले आहे. अशाप्रकारे गावठानातील सुमारे 15 एकर जागा वापरण्यायोग्य बनवून ग्रामपंचायतीने इतर गावांपुढे आदर्श ठेवला आहे. 

विद्यमान सरपंच डॉ. विजय होनमाने आणि सदस्यांनी अडिच वर्षांपासून विविध विकासात्मक कामांबरोबरच अभिनव उपक्रमांचा धडाका लावला आहे. त्यामध्ये करवसूलीसाठी "सुवर्ण बक्षिस योजना", गावातील नागरीकांच्या अंत्यविधीसाठी "वैकुंठगमन" योजना यांचा समावेश होतो. याचप्रमाणे गावाचे सौंदर्य वाढावे, पडक्‍या घरामुळे, खड्ड्यांमुळे तसेच वाढलेल्या गवत व झुडूपांमुळे लोकांना विविध सरपटणारे प्राणी व दुर्गंधीचा नाहक त्रास होत होता. विविध साथीचे आजार पसरत होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून "खिंडारमूक्त गाव' योजना राबविण्याचे ठरले. तात्काळ सुरवात केली.

सुमारे 6 लाख रुपये खर्च करुन गावठानातील सर्व पडक्‍या जागांचे सपाटीकरण करण्यात आले आहे. या सपाटीकरणामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडली असून भव्य अशी मैदाने तयार झाली आहेत. याठिकाणी वृक्षारोपण करण्याचा मानस असल्याचे सरपंच होनमाने यांनी स्पष्ट केले. खिंडारमूक्त गाव योजनेमुळे सदर सपाटीकरण झालेल्या जागांचे मोल वाढले आहे. राज्यात वांगी हे पहिलेच "खिंडारमूक्त गांव" असावे अशी नागरीकात चर्चा आहे. 

 

संपादन : घनशाम नवाथे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wangi became a crater-free village .flattened by demolishing old houses