ज्योतिष जाणून घ्यायचंय... या शिर्डीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

शिर्डी ः बृहन्‌ महाराष्ट्र ज्योतिष मंडळातर्फे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनास उद्यापासून (ता. 14) प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात तीनशेहून अधिक ज्योतिषी सहभागी होणार आहेत. यानिमित्त ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चासत्रे होणार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी व या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्योतिषांना "ज्योतिषभूषण' पुरस्काराने सन्मानित केले जाईल, अशी माहिती बृहन्‌ महाराष्ट्र ज्योतिष महामंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी दिली.

जाणून घ्या - इंदोरीकारांना का चढावी लागणार कोर्टाची पायरी

हे राहतील उपस्थित 
कार्याध्यक्ष ऍड. मालती शर्मा व उपाध्यक्ष विजय जकातदार उपस्थित होते. सीए प्रा. एस. झेड. देशमुख, राहात्याच्या नगराध्यक्ष ममता पिपाडा, शिर्डीच्या नगराध्यक्ष अर्चना कोते, डॉ. राजेंद्र पिपाडा, "ग्रहांकित'चे संपादक चंद्रकांत शेवाळे यांच्या उपस्थितीत अधिवेशनास प्रारंभ होईल. अध्यक्षस्थानी प्रा. जवाहर मुथा राहणार आहेत.

यावर होणार व्याख्याने

अधिवेशनात विद्यासाधना, रत्नशास्त्र, आरोग्यनिदान, पायाच्या बोटाच्या आकारावरून व्यक्तिमत्त्वाचा अंदाज, कुंडली, जेमिनी, रमल व कृष्णमूर्ती पद्धती, अष्टक वर्ग, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र आदींबाबत अभ्यासकांची व्याख्याने होणार आहेत. उपासना, फेंगशुई, ग्रहांची उपासना, प्रवेशद्वार व त्यांचे आकार, शिक्षणयोग, करिअर मार्गदर्शन आदी विषयांवर चर्चा होईल.

खासदार सदाशिव लोखंडे, ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे, रामराव हरदास, अरविंद चांदेकर यांच्या उपस्थितीत समारोप होईल. 

या निमित्त आनंद कुलकर्णी, अरुंधती पोतदार, गोपालकृष्ण रत्नपारखी, शैलेश देशपांडे, आरती घाटपांडे, डॉ. विकास खिलारे, अमरनाथ स्वामी, मेघश्‍याम पाठक यांना "ज्योतिषभूषण' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Want to know astrology in this Shirdi