यंदा पालखीत "वारी नारीशक्ती'ची

Wari
Wari

माळीनगर - यंदा संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालख्यांमध्ये पुणे ते वाखरीदरम्यान "वारी नारीशक्ती'ची हा उपक्रम राज्य महिला आयोगाकडून राबविला जाणार आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरण दिंडी काढण्यात येणार आहे.

आषाढी, कार्तिकीची वारी हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संचित म्हणून ओळखले जाते. लाखो भाविक त्यात सहभागी होत असतात. वारकरी महिलांचा लक्षणीय सहभाग हेदेखील या पालख्यांचे वैशिष्ट्य. वारीचे हे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन यंदा पालख्यांमध्ये "वारी नारीशक्ती'ची या उपक्रमांतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी राज्य महिला आयोग काढणार आहे.

"वारी नारीशक्ती'ची वैशिष्ट्ये
- दोन्ही मार्गांवरील चित्ररथांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे व्हेडिंग मशिन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी "इनसिनेटर मशिन'.
- महिला सक्षमीकरणाचे संदेश देण्यासाठी वारीच्या दोन्ही मार्गांवर फिरता चित्रपट महोत्सव.
- महिला कीर्तनकार, पोवाडाकार आणि भारूडकार यांचे ठिकठिकाणी कार्यक्रम.
- सक्षमीकरणाच्या दिंडीमध्ये दररोज एका क्षेत्रातील नामवंताचा सहभाग.
- मुस्लिम महिलांचे पथकही या दिंडीमध्ये सहभागी होणार.

महिलांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्यांबाबत जागृती, त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती पोचविणे, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. यातून पाच लाख महिलांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- विजया रहाटकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com