निवृत्तिनाथांच्या पालखीचा नगर जिल्ह्यात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

अहमदनगर - श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर 28 जूनपासून जल्लोषात सुरू आहे. संत निवृत्तिनाथ महाराज पालखी दिंडी पंढरपूरकडे वाटचाल करीत आहे. नाथांच्या दिंडीने सोमवारी नगर शहरात प्रवेश केला. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील हमाल पंचायतच्या कार्यालयाजवळ हनुमान मंदिरात पालखीचा मंगळवापर्यंत मुक्काम आहे. उद्या (ता. 10) श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांचा समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होईल.
Web Title: Wari Palkhi Nivruttinath maharaj palkhi