वाळलेल्या भाकरी अन् चटणी दिल्याने रावतेंसमोरच वारकऱ्यांचा गोंधळ

वाळलेल्या भाकरी अन् चटणी दिल्याने रावतेंसमोरच वारकऱ्यांचा गोंधळ

पंढरपूर : एसटी महामंडळाच्या वतीने आज पंढरपुरात नवीन बसस्थानक आणि यात्री निवास भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान वेळेपेक्षा सुमारे दोन तास  कार्यक्रम लांबल्याने भुकेने व्याकुळ झालेल्या वारकर्यांनी परिवहन मंत्र्यांच्या समोरच जेवणाच्या कारणावरून गोंधळ घातला.

शिळी भाकरी आणि चटणी दिल्याने वारकऱ्यांचा संताप अनावर झाला. यामुळे रावतेंची आचार संहितेपूर्वीची भूमिपूजन घाई अंगलट आल्याचे चित्र पहायला मिळाले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निवडणूकीच्या तोंडावर राज्यातील वारकर्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी आज वारकर्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी राज्यभरातून सुमारे तीनशेहून अधिक एसटी बस गाड्यामधून हजारो वारकऱ्यांना आणले होते. आलेल्या वारकऱ्यांची संयोजकांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

सकाळी 10 वाजल्यापासून हजारो वारकरी मंडपात बसले होते. तासाभरात संपणारा कार्यक्रम दुपारी दोन वाजता संपला. त्यानंतर कार्यक्रमस्थळी जेवणासाठी एकच गोंधळ उडाला. त्यातच शिळी भाकरी आणि चटणीचे वाटप केल्यामुळे वयोवृध्द वारकऱ्यांचा संताप अनावर झाला. अनेक वारकऱ्यांनी सर्वांसमोर वाळलेल्या भाकरी चटणी दाखवल्याने संयोजकांनी आलेल्या वारकऱ्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

हा सगळा गोंधळ याची देही, याची डोळा अनुभवत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com