वारणा समूह देशातील सहकार, शिक्षणाची पंढरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

वारणानगर - ‘‘तात्यासाहेबांनी सहकार आणि शिक्षणातून विकासाची मुहूर्तमेढ रोवली. आज वारणा हे देशातील सहकार आणि शिक्षणाची पंढरी ठरली आहे. विनय कोरे यांनी २१ व्या शतकातील शिक्षणातील आव्हाने ओळखून शिक्षणाची सुवर्णक्रांती घडविण्याचे काम केले असल्याचे मत सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ ॲल्पाइड सायन्सेस इंदोरचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.  तात्यासाहेब कोरे पब्लिक चॅरिटेबल संचालित विनय कोरे गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित २०१६- गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विनय कोरे होते. प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह जी.डी. पाटील यांनी स्वागत केले.

श्री. कोरे म्हणाले, ‘‘२१ व्या शतकात गुरुदेव कार्यकर्त्यांनी समाज घडविण्यासाठी जबाबदारी घ्यावी.’’
सत्कारमूर्ती शिक्षक आनंदराज पाटील, बाबू केसरकर, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी बाळकृष्ण हसबनीस, विद्यार्थी सानिया डोईजड, श्रेणी बुधाळे, निशिगंधा माने यांनी मनोगत व्यक्त केले.   
शिक्षण भूषण पुरस्कारप्राप्त शिक्षक, पन्हाळा तालुका : प्राथमिक विभाग : संजय माने, भारती प्रभाकर चोपडे. माध्यमिक विभाग : प्रकाश पाटील. शाहूवाडी : प्राथमिक विभाग- रत्नसंध्या पाटील, विक्रम पाटील. माध्यमिक विभाग- आनंदराज पाटील, हातकणंगले तालुका : प्राथमिक विभाग- बाबू केसरकर. माध्यमिक विभाग : राहुल तातोबा कुंभार, वाळवा तालुका : प्रशांत पाटील,
माध्यमिक विभाग : सुरेश कागवाडे. दहावी शालांत परीक्षेतून तालुक्‍यातील प्रथम आलेले विद्यार्थी- पन्हाळा- धनश्री पांडुरंग सिद. शाहूवाडी तालुका- अनुजा महेंद्र शिंदे, हातकणंगले- शंतनू शरदकुमार संकपाळ, वाळवा- सुखदा बाळासाहेब डोंबाळे, शिराळा- राहुल उत्तम पाटील.

तसेच, श्री. कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील १६ विजेत्यांना गौरविले. राष्ट्रीय पंच म्हणून काम पाहिलेल्या रमा पोतणीस, हॉकीची राष्ट्रीय खेळाडू चाचा नेहरू पुरस्कार विजेती ऐश्‍वर्या चव्हाण यांचाही सत्करा झाला. शामराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, गटशिक्षणाधिकारी एम.के. चव्हाण, विस्तार अधिकारी सौ. कासोटे, प्राचार्या डॉ. सुरेखा शहापुरे, प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्राचार्य जॉन डिसोझा, समन्वयक राजेंद्र कापरे, किरण पाटील, विकास चौगुले उपस्थित होते.

Web Title: Warna group; Education Pandhari