सभासदांचा पाच हजारांचा शेअर्स संघाच्या नफ्यातून दहा हजारांचा करणार - कोरे

संजय पाटील
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

वारणानगर - येथील वारणा दूध संघाच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त दूध उत्पादक सभासदांचा सध्याचा पाच हजारांचा शेअर्स संघाच्या नफ्यातून तो दहा हजारांचा, संस्था सभासदांचा दहा हजारांचा शेअर्स संघाच्यावतीने 50 हजारांचा करणार आहे, असे आश्वासन संघाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी केली. 

वारणानगर - येथील वारणा दूध संघाच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त दूध उत्पादक सभासदांचा सध्याचा पाच हजारांचा शेअर्स संघाच्या नफ्यातून तो दहा हजारांचा, संस्था सभासदांचा दहा हजारांचा शेअर्स संघाच्यावतीने 50 हजारांचा करणार आहे, असे आश्वासन संघाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी केली. 

तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त वार्षिक सभेत अध्यस्थानावारून डॉ. कोरे बोलत होते.

डाॅ. कोरेंची घोषणा - 

  • संस्था सभासदांचा दहा हजारांचा शेअर्स संघाच्यावतीने 50 हजारांचा करणार 
  • वारणाकडे दूध पुरवठा करणाऱ्या 1 लाख 10 हजार दूध उत्पादकांचा दोन लाखांचा विमा संघामार्फत उतरविणार 
  • वारणा परिसर जातीवंत जनावरांचे केंद्र निर्माण करणार.
  • दुबई, कराचीत टेट्रापॅकमधून 10 लाख लिटर्स दूध पाठविणार 

कोरे पुढे म्हणाले, सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी स्थापन केलेल्या संघाची सुवर्णमहोत्सवी वर्षात 783 कोटींची उलाढाल, 83 कोंटींचा नफा, दूध संकलनामध्ये 16 कोटीं 42 लाख लिटर्सची वाढ ही पन्नास वर्षातील सर्वाधिक वाढ असून डिझेल दरात वाढ होवूनही 89 पैशावरून प्रतिलिटरला 84 पैसे खर्च झाला आहे. दूध उत्पादकांच्या जनावरांसाठी संघाचे डॉक्‍टर्स थेट गोट्यात उपचार करणाऱ्या "स्पेशल व्हिजेट" ची नोंद नेदरलॅंडच्या प्रतिनिधीनी घेतली. हा उपक्रम देशातील एकमेव आहे.

जनावरांच्या स्तनदाह(मस्टेरिया) सारख्या सर्वच अजारावर डॉ. ए.पी. कोटगिरे यांनी होमिओपॅथिक पध्दतीने उपचार करण्याची पध्दत यशस्वी केली असून हा उपक्रम देशातील सर्वप्रथम आहे. इनाफच्या माध्यमातून दूध उत्पादकांची मोजदाद होणार असून या उपक्रमामुळे प्रत्येक जनावरांची एकत्रीत माहिती मिळणार असल्याने सर्वच दूध उत्पादकांनी बॅंकेत खाती सुरु करुन संस्थामार्फत संघाकडे माहिती द्यावी, असे डाॅ. कोरे म्हणाले

देशात दूध पदार्थ विक्रीत वारणाला तिसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून गायीच्या 3.5 फॅट 8.5 एसएनएफला 25 रुपये प्रतिलिटर दर दिला असून यामध्ये 8.4 एस.एन.एफ.झाल्यास वारणा फक्त 30 पैसे कमी करतो तर अन्य संघ 1 रुपये 50 पैसे कमी करतात. टेट्रापॅकमधील दूध आदिवासी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 55 हजार लिटर प्रति महिलन्याला व भारतीय सैन्य दलाला 44 लाख लिटर पाठविले जाणार आहे.

-  डॉ. विनय कोरे

डॉ. कोरे यांच्या हस्ते वारणा बासुंदी उत्पादनाचा प्रारंभ झाला. कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत करून संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला. सचिव के.एम.वाले यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

बॅंक ऑफ इंडिया बॅंकेचे विभागीय अधिकारी नितीन देशपांडे, अमृतनगर शाखा प्रबंधक विमलकुमार, लेखापरिक्षक ए.डी.शिंदे, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, संघाचे उपाध्यक्ष डॉ.भाऊसाहेब गुळवणी, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, सचिव के.एम.वाले उपस्थित होते. 

Web Title: warnanagar cooperative milk organization meeting Vinay Kore comment