सांगलीत व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा;बंदच्या आदेशाने संताप

Warning of agitation of traders in Sangli covid 19 impact marathi news
Warning of agitation of traders in Sangli covid 19 impact marathi news
Updated on

सांगली : राज्य शासनाने जाहीर केलेल्या अंशतः टाळेबंदीच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. शासनाने सुधारित आदेश काढावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा व्यापारी नेत्यांनी दिला आहे. पाडवा आणि लग्नसराईच्या प्रारंभालाच शासनाने ऐंशी टक्के बाजारपेठेला टाळे लावले आहे. त्यातून महापालिका क्षेत्रातील व्यापारच रसातळाला जातील अशी भिती व्यक्त होत आहे. 

मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाच सुक्ष्म तपशिल अद्याप जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झालेले नाहीत. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी साडे तीनला बैठक आहे त्यानंतरच तपशिल स्पष्ट होतील. व्यापारी नेत्यांनी गेले आठवडाभर आम्हाला विश्‍वासात घ्या अशी सातत्याने मागणी केली आहे मात्र आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणत्याही स्वरुपात याबाबत संपर्क झाला नसल्याचे व्यापारी नेते समीर शहा यांनी "सकाळ' ला सांगितले. 

ते म्हणाले, शहरातील स्थानिक स्थिती विचारात घेऊन प्रशासनाने मंत्री मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे. जीवनावश्‍यक दुकाने सोडून म्हणजे नेमकी कोणती दुकाने सुरु राहणार याबाबत तपशिल स्पष्ट नाही. रेस्टॉरंट बंद आणि वडापावचा गाडा सुरु या धोरणात सुरक्षित अंतर कोठे पाळले जाते हे शासनाने आधी स्पष्ट करावे. शहरात टाळेबंदी लागू होईल त्याचवेळी ग्रामिण भागात शिथिलता असेल.

महिनाभर दुकाने बंद राहिली तर संपुर्ण व्यापारच तिकडे जाईल. गेली दोन वर्षे व्यापारी घायकुतीला आहे. यापुढे अशी स्थिती राहिली तर व्यापाऱ्यांना जगणेच अवघड होईल. रेटून टाळेबंदी लागू केल्यास आम्ही दोन दिवसात कठोर आंदोलनासाठी तयार आहोत. गुढी पाडवा, लग्नसराईचे दिवस आहेत अशा काळात व्यापार बंद ठेवला तर पुढील वर्षच वाया गेल्यासारखे आहे. ऐंशी टक्के व्यापार बंद राहणार आहे हेच अद्याप दुकानदारांना माहित नाही. ते पुर्ण समजेल तेव्हा उद्रेक झालेला असेल.''

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com