शिवसेनेचा 'हा' मंत्री म्हणताे सध्या माझी तारेवरची कसरत सुरु आहे

शिवसेनेचा 'हा' मंत्री म्हणताे सध्या माझी तारेवरची कसरत सुरु आहे

कोयनानगर (जि. सातारा) :  सातारा जिल्हा बौद्धीक विचाराची राजधानी आहे.पाटण सारख्या ग्रामीण भागात साहित्य संमेलन घडत असले तरी पाटणकर असंवेदनशील व अल्पसंख्याक रसिक असल्याची जळजळीत टीका प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे यांनी पाटण साहित्य संमेलनात केली आहे.

पाटण सारख्या ग्रामिण भागामध्ये साहित्य संमेलन घडत आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. ग्रामिण भागातील लोकांना व विद्यार्थ्यांना पुस्तकाचे भांडार उपलब्ध करुन देऊन विक्रमबाबांनी मोलाचे काम केलेले आहे. विक्रमबाबा पाटणकर यांनी ग्रामीण भागामधील लोकांना व्यासपीठ निर्माण करुन दिलेले आहे. या संमेलनाची व्याप्ती वाढत जाऊन या साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्य सरकारचे पूर्णत:हा सहकार्य राहिल अशी ग्वाही राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. 

स्वातंत्र्यसैनिक (कै.) भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आयोजित ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलन भडकबाबा नगरीमध्ये होत असून या संमेलनाचे उदघाटन प्राचार्य डॉ. सुनिलकुमार लवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हाेते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, आरपीआयचे सरचिटणीस रविंद्र सोनावले उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित सर्वांचे स्वागत स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी पुस्तके देऊन केले. स्वागताअध्यक्ष म्हणून डॉ. विद्या पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय गुरव व निकिता पवार यांनी केले.

हेही वाचा - एकीला पुढे,दूसरीला मागे असे चालत नाही;पवारांची मिश्किल टिप्पणी

राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले गेला एक महिना तारेवरची कसरत करत आहे सुमारे ७०० किलोमीटरवरचा जिल्हा मला पालकमंत्री म्हणून दिला आहे. मी प्रतीवर्षी या संमेलनास येत असतो. वडिलांच्या स्मृतीप्रित्यार्थ हे संमेलन घेणे हे फार कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागामध्ये संमेलन घेणे सोपी गोष्ट नाही. अधिक प्रभावी हे संमेलन करता यावे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ग्रामीण भागातील माणसांपर्यंत व मुलांपर्यंत हे साहित्य व पुस्तके पोहचली पाहिजेत. राजकिय क्षेत्रात अनेक राजकीय कार्यक्रम घेत असतो परंतू ज्ञानाचे भांडार सुरु करुन अत्यंत चांगला उपक्रम सुरु केलेला आहे. हे अधिक प्रभावी व्हावे व महाराष्ट्र राज्यामध्ये या साहित्य संमेलनास दाद मिळावी यासाठी आपण प्रयत्न करुयात. 

जरुर वाचा - Video : मी पुन्हा येईनने नेटकऱ्यांत घातला धुमाकूळ

उदघाटक सुनिलकुमार लवटे म्हणाले मी नेहमी अश्या साहित्य संमेलनात जात असतो. ज्यांना संवेदनेचा पाझर असतो, ज्यांना ज्ञानाचे भांडार असते तेच लोक साहित्य संमेलनास उपस्थित असतात. आज पाटणची एक टक्का ही जनता ही इथं उपस्थित नाही. दु:ख याच वाटतं नाही कारणं किती लोक आले याचा विचार न करता, आले त्यांचा विचार करावा. मांडव घालायचं काम आपणं करायचं एक दिवस मांडावा पलिकडे गर्दी जाईल. तुम्हांला तुमच्या मुलांची पिढी वाचवायची असेल तर वाचनाची सुरवात केली पाहिजे. हल्ली लोक वाचत नाहीत परंतू वाचनाने माणूस समृध्द होतो. अमरमृद्रा पुस्तके घडवत असतात. साहित्य संमेलने नव्या पिढीला जगायचं कसं अन् वाचायचं कसं हे देतात.

सातारा जिल्ह्यातील मंडळीनीं २४ वर्ष साहित्य संमेलन ग्रंथ महोत्सव केला हे दिशादर्शक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ग्रंथ संस्कृती रुजलेली आहे हे मला समजले. ग्रंथ महोत्सव नव्या पिढीला उर्जा देतात. गावामध्ये पुस्तकांची संग्रालये असणे म्हणजे गाव समृध्द असणं. पुस्तके परंपरा जपत असतात. तुम्ही सुशिक्षित  आहात याचं लक्षण म्हणजे तुमच्या घरी असणारं पुस्तकाचं भांडार. साहित्य संमेलनामध्ये सातत्य असावे. उद्याचं जग हे वाचणार्यांचं असणार आहे. निकिता पवार यांनी आभार मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com