काेणी तरी पाणी वाचवा हाे पाणी..(व्हिडिआे)

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 15 मे 2019

सातारा ः सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्‍यांमधील गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वळिवाचा पाऊस तर सोडाच पण मॉन्सून लांबण्याची शक्‍यता मंगळवारी (ता. 14) वर्तविण्यात आली. आता दुष्काळी भागातील भीषणता दिवसागणिक वाढेल. याचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन पावले उचलत आहे. परंतु, दुसरीकडे पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र सातत्याने दिसत आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, जलवाहिन्यांची गळती थांबावी यासाठी "सकाळ सातारा' आवृत्तीने पुढाकार घेतला. गावागावांमधील रस्त्यांवरील, खासगी जागांमधील पाणी गळतीचे छायाचित्र, व्हिडिओ प्रसिद्ध केले. प्रशासनाने त्याची दखल घेत काही ठिकाणच्या जलवाहिनींच्या गळती काढण्यास प्रारंभ केला आहे. काही ठिकाणच्या गळती काढल्या आहेत. नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत काही ठिकाणी नळांना तोट्या बसविल्या.
तरीही अद्याप वाया जाणाऱ्या पाण्याबद्दल शासकीय यंत्रणा गांभीर्याने घेत नाही, याचे सचित्र दर्शन सातारा शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये गेल्यावर दिसते.जिल्हा परिषदेमधील मत्स्य विभागाशेजारील दालन असो अथवा पंचायत समिती कार्यालयानजीकची जलवाहिनी असो. गेले 10 ते 15 दिवस झाले या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. नागरिक त्याची कल्पना संबंधित प्रशासनास देत आहेत. तरीही पाणी वाचविण्यासाठी कोणीच दखल घेत नाही हे दुर्दैव.

Web Title: Wastage of Water should be stopped