शिकारी तांड्यांसह हुल्लडबाजांवर वॉच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली पायवाटांवरून वन्यजीव विभागाला हुलकावणी देऊन येणाऱ्या शिकारी तांड्यांसह अवैध हुल्लडबाज लोकांवर वॉच ठेवण्यासाठी संरक्षण कुटी उभारण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात पाटण तालुक्‍यातील हुंबरणे, कोळणे, रासाटी, कारळे वाघणेसह आटोलीला संरक्षक कुटी उभारल्या आहेत. त्यामुळे त्या भागातील व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या शिकारी तांड्यांना लगाम बसला आहे. 

कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली पायवाटांवरून वन्यजीव विभागाला हुलकावणी देऊन येणाऱ्या शिकारी तांड्यांसह अवैध हुल्लडबाज लोकांवर वॉच ठेवण्यासाठी संरक्षण कुटी उभारण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात पाटण तालुक्‍यातील हुंबरणे, कोळणे, रासाटी, कारळे वाघणेसह आटोलीला संरक्षक कुटी उभारल्या आहेत. त्यामुळे त्या भागातील व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या शिकारी तांड्यांना लगाम बसला आहे. 

शिकाऱ्यांचा मोठा प्रश्न सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात भेडसावत आहे. त्या शिकारी रोखण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी संरक्षक कुटीसाठी सुमारे 50 लाखांची भरीव तरतूद केली होती. त्या शिकारी रोखता याव्यात, यासाठी पाटण तालुक्‍यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी सरंक्षक कुटी उभी करण्यासह शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार जंगली पायवाटांवर सरंक्षक कुटीतूनच कर्मचारी अवैधरित्या जंगलात येणाऱ्यांसह शिकारी लोकांवरही वॉच ठेवताना दिसत आहेत. त्यामुळे कोकण भागातून येणाऱ्या शिकाऱ्यांसह अन्य लोकांवरही त्यामुळे निर्बंध लागला आहे. संरक्षक कुटीत दोन व्यक्तींची राहण्याची सोय केली आहे. त्या ढाच्याचीच कुटी आहे. काही दिवसांपूर्वीच ते काम पूर्ण झाले आहे. प्रत्यक्षात त्या कुटी उभ्या राहिल्या आहेत. साताऱ्यासह कोल्हापूर, रत्नागिरी व सांगली जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. त्याच्या कोकण कड्यासह जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील अनेक पायवाटांवर शिकारी लोकांची नेहमीच वर्दळ असते. बंदुकांसह गावठी हातबॉम्ब घेऊन लोक श्वापदांच्या शिकारीसाठी येतात. वन विभागाने किमान पाच टोळ्यांतील 30 लोकांना जेरबंद केले आहे. मात्र, तरीही कोकण कड्यापासून पाटण व कोयनेच्या जंगलात येणाऱ्या शिकाऱ्यांच्या तांड्यांवर निर्बध घालता येत नव्हते. 

व्याघ्र प्रकल्पातील ती गोष्ट शासनाने लक्षात घेवून संरक्षक कुटीसाठी मोठी तरतूद केली. संरक्षक कुटीच्या प्रश्नावर शासनाने मंजुरी देतानाच निधीची तरतूद केली. अलीकडेच त्या सरंक्षक कुटी उभ्या राहिल्या आहेत. त्यासाठी पन्नास लाखांची तरतूद केली आहे. त्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीच्या संरक्षक कुटी व्याघ्र प्रकल्पात उभ्या आहेत. किमान दोन कर्मचाऱ्यांना निरीक्षणाचीही सोय त्यात आहे. व्याघ्र पहिल्या टप्प्यात सहा गावांत संरक्षक कुटी उभारणार आहेत. ढेबेवाडी परिक्षेत्रातील हुंबरणे, आटोली, कसणी व कारळे, चांदेली अभयारण्यातील कोळणे व वाघणे, कोयना भागातील चांदोली अभयारण्यातील रासाटी गावांचा समावेश आहे. हुंबरणेला आठ लाख 32 हजार, कोळणेला सहा लाख 40 हजार, रासाटीला नऊ लाख 90 हजार, कारळेला आठ लाख 22 हजार, वाघणेला नऊ लाख 90 हजार व आटोलीला आठ लाख 32 हजार रुपये खर्चून त्या संरक्षण कुटी उभ्या आहेत. 

शिकारी रोखण्यासाठी वन विभागाने काही पावले उचलली आहेत. त्याचा एक भाग म्हणून संरक्षण कुटी कार्यरत आहेत. त्या माध्यमातून शिकारी तांड्यांसह त्या भागात अवैधरित्या येणाऱ्या हुल्लडबाजांवरही नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी संरक्षण कुटी सोयीस्कर आहेत. 

- श्रीकांत कुलकर्णी,  वनक्षेत्रपाल, ढेबेवाडी 

Web Title: Watch the hunter in Sahyadri Tiger Reserve