शंभरावर सीसीटीव्हींचा गणेशोत्सवात वॉच 

Watching the hundreds of CCTV in Ganesh Festival
Watching the hundreds of CCTV in Ganesh Festival

कऱ्हाड : पालिकेतर्फे शहरातील विविध चौकांत सुमारे 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शहरावर 24 तास वॉच राहील. याच कॅमेऱ्यांचा पोलिसांना गणेशोत्सवात उपयोग होईल. त्यामुळे नेहमीच अलर्ट राहून स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे काम सुकर झाल्याचे दिसते. 

पालिकेने शहरातील निवडक तीसहून जास्त ठिकाणी 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मुख्य रस्त्यासह शहरांतर्गत चौकांची ठिकाणे कॅमेराबद्ध झाली आहेत. दत्त, आझाद चौक ते चावडी चौक व पुन्हा चावडी चौकातून थेट कमानी मारुती मंदिर ते कृष्णा नाका या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावरही कॅमेरे आहेत. गणेशोत्सवातील विसर्जनाचा मार्ग म्हणून त्याची ओळख आहे. दत्त चौकातून व कृष्णा नाक्‍याहून चावडी चौकमार्गे गणेशमूर्ती कृष्णार्पण होतात. त्यामुळे अनंत चतुदर्शीदिवशी गर्दी असते. त्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी, चोऱ्या होवू नयेत यासाठी कॅमेरे उपयोगी पडल्याचे दिसतात. 

सध्या गणेशोत्सवावर या 100 कॅमेऱ्यांचा वॉच असेल. कृष्णा-कोयना संगमावरील प्रीतिसंगम बागेत 25, पालिका मंडई परिसरात सहा, दत्त चौकात आठ, आझाद चौकात सहा, तर चावडी चौकात सहा कॅमेरे आहेत. हे कॅमेरे चालू स्थितीत आहेत. त्यांचा मुख्य सर्व्हर पोलिस ठाण्यात आहे. त्याचा डिस्प्लेही पोलिस ठाण्यात ठेवला आहे. त्याचा फायदा पोलिसांना होत आहे. पालिका अजूनही काही कॅमेरे वाढवणार आहे. त्याचाही फायदा पोलिसांना होऊन शहर सुरक्षित राहण्यास हातभार लागेल. 

...या चौकांत आहेत कॅमेरे 
आझाद चौक, चावडी चौक, कृष्णा घाट, प्रीतिसंगम बाग परिसर, पालिका इमारत व भाजी मंडई परिसर, अंडी चौक, आल्हाद गणेश मंडळ, रविवार पेठ पाण्याची टाकी, बॅंक ऑफ इंडिया इमारत, सात शहीद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले पुतळा परिसर, कोल्हापूर नाका, कार्वे नाका, दैत्यनिवारिणी मंदिर व बीएसएनएल कार्यालय परिसर, गुरुवार अर्बन बॅंक व दर्गा मोहल्ला परिसर. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com