आटपाडीत २६ जूनला पाणी परिषद

आटपाडीत २६ जूनला पाणी परिषद

वाळवा - आटपाडीसह तेरा दुष्काळी तालुक्‍यांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटप व्हावे या मागणीसाठी येत्या २६ जूनला आटपाडी येथे पाणी परिषद होईल. परिषदेचे हे २७ वे वर्ष आहे. ही माहिती परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परिषदेच्या नियोजनासाठी येत्या शुक्रवारी (ता. १०) पाणी संघर्ष चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आटपाडीत आहे, ते म्हणाले,‘‘क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली १९९३ मध्ये आटपाडीसह तेरा दुष्काळी तालुक्‍यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळाले पाहिजे यासाठी आंदोलन सुरू झाले होते. त्यासाठी दरवर्षी २६ जूनला आटपाडीत पाणी परिषदेचे आयोजन केले जाते.

सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त जनता या परिषदेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहते. आपले कार्यक्षेत्र सोडून नागनाथ अण्णा नायकवडी यांनी दुष्काळी  भागातील जनतेसाठी मोठा लढा उभारला. आज या परिसरात आंदोलनाचे फलित दिसत आहे. कालवे, पोट कालवे, पाटाची कामे गतीने सुरू आहेत. हे पाणी संघर्ष चळवळीचे यश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com