Water Crisis : यंदा पाऊस लांबला तरी पुरेसे पाणी; कोयना, चांदोली धरणात किती आहे पाणीसाठा?

यंदा पाऊस उशिरा सुरू झाला तरी ३० जूनपर्यंत टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना चालवता येतील एवढे पाणी हाताशी आहे.
Koyna Dam Patan Satara
Koyna Dam Patan Sataraesakal
Summary

कोयना धरणात यंदा ९१ टीएमसी पाणीसाठा होता. पैक ६७ टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरले जाणार होते. आतापर्यंत ५८ टीएमसी पाणी वापरले गेले आहे.

सांगली : सध्या कोयना धरणात (Koyna Dam) २८.३९, तर चांदोली धरणात (Chandoli Dam) १३.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा पाऊस उशिरा सुरू झाला तरी ३० जूनपर्यंत टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना चालवता येतील एवढे पाणी हाताशी आहे. विद्युतनिर्मितीच्या पाण्यात ८ टीएमसीची कपात आणि पाणी वाटपाबाबत गेल्या दोन महिन्यांत काटेकोरपणा राखत पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) दुष्काळाचे संकट हाताळले आहे. सातारा जिल्ह्यातून पाणीसाठा कमी असल्याचा गळा काढून सुरू असलेली आदळआपट आता थांबली आहे.

ऑगस्टपासून सांगलीलगत कृष्णा नदीपात्र (Krishna River) तीनवेळा कोरडे पडले. त्यानंतर तोफेच्या तोंडी आलेल्या पाटबंधारे विभागाने धडपड केली. सांगली बंधाऱ्याचे बरगे दुरुस्त करून घेतले. धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन विस्कळित होणार नाही, याची काळजी घेतली. अखेर उन्हाळा सरताना नियोजनात सुधारणा केल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाटबंधारे विभागाकडे चुकूनसुद्धा कुणाची वक्रदृष्टी पडू नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचे स्पष्ट होते.

Koyna Dam Patan Satara
Radhanagari Dam : राधानगरी, काळम्मावाडी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; भोगावती, पंचगंगा तुडुंब

१४ टीएमसी इतका कमी पाणीसाठा हाताशी असताना, सातारा जिल्हा प्रशासनाकडून मोठी कोंडी केली असताना हे दिव्य पार पाडले गेले. आणखी ५० दिवस शिल्लक आहेत. या काळाचे नेटके नियोजन केले असून जिल्ह्यातील सिंचनावर आधारित शेतकरी, नदीकाठच्या उपसा सिंचन योजना आणि शहरांसह गावांच्या पिण्याच्या पाणी योजनांची व्यवस्था पूर्ण असल्याचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

कोयना धरणात यंदा ९१ टीएमसी पाणीसाठा होता. पैक ६७ टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरले जाणार होते. आतापर्यंत ५८ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. प्रकल्पांसाठी ४२.७० टीएमसी एवढी तरतूद आहे. पैकी ‘टेंभू’साठी १५.७१, ‘ताकारी’साठी ५.२५, ‘म्हैसाळ’साठी १३.५३ टीएमसी पाणी उपसले गेले आहे.

Koyna Dam Patan Satara
कोयना धरण प्रकल्पातून जादा वीजनिर्मिती होणार? वेळेत पाऊस झाला नाही, तर विजेची मागणी वाढण्याची शक्यता

हा एकूण उपसा ३४ टीएमसी आहे. ३० जूनपर्यंत कोयनेतून ७.५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी चांदोली धरणात १३.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पैकी ६.३८ टीएमसी साठा वापरायोग्य आहे. म्हैसाळ योजनेसाठी चांदोलीतून आणखी १ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे चांदोली धरणावरही फारसा ताण नाही.

Koyna Dam Patan Satara
Kolhapur Rain Update : कागल, भुदरगडला वळवाने झोडपले; वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, झाडे उन्मळली

निवडणूक काळात संपूर्ण यंत्रणेवर लक्ष

लोकसभा निवडणुकीच्या काळात कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीतील पाणी पातळी, सिंचन योजनांचे आवर्तन या सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळल्या गेल्या. त्यात गडबड झाली असती तर त्याचा प्रचारावर परिणाम झाला असता. आधीच गेल्या सहा महिन्यांत पाटबंधारे विभागाला सातत्याने टार्गेट केले गेले होते. या काळात सातारा पालकमंत्र्यांनीही सौम्य भूमिका घेतल्याचे दिसून आले. अर्थात, अखंड निवडणूक प्रचारात कोयना धरणाचा पाणीप्रश्‍न चर्चेत आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com