वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात मंगळवेढ्यातील आसबेवाडी प्रथम

हुकुम मुलाणी
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

आमदार भारत भालके,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, भारतीय जैन संघटना, ग्रामस्थांनी व सकाळनी केलेल्या सहकार्याने या स्पर्धेत 61889 घनमिटरचे काम केल्यामुळे आम्हाला यश मिळाले असले ताळेबंद जुळवण्यामध्ये माहिती अभावामुळे राज्यात येण्याची संधी हुकल्याची खंत वाटते.
- कलावती आसबे सरपंच आसबेवाडी
 

मंगळवेढा : पाणी फाऊंडेशन ’सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात आसबेवाडीने प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक मिळवत तालुक्यासाठी असलेले दहा लाखांचे तर उत्कृष्ट काम केल्या बद्दल शासनाकडून पाच लाखाचे असे एकुण पंधरा लाखाचे बक्षीस पटकावले. डोंगरगावने दुसरा पाच लाखाचा तर शिरसीने तिसरा क्रमांक तीन लाखाचा पटकाविला.

पुणे येथील बालेवाडी क्रिडा संकुलात या वॉटर कप स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण आज दि 12 रोजी पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते तर वॉटर कप स्पर्धेचे प्रणेते अभिनेता अमिर खान, अभिनेत्री किरण राव यांच्या उपस्थितीत  यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्विकारले. सन्मानपत्र व दहा लाख रूपयांचा धनादेश असे बक्षीसाचे स्वरूप होते. वॉटर कप स्पर्धा 2018मध्ये तालुक्यात 8 एप्रिल ते 22 मे कालावधीत ही स्पर्धा झाली. यामध्ये 53 गावांनी सहभाग घेतला . त्यापैकी 35 गावांनी प्रशिक्षन घेतले होते.प्रत्यक्ष सहभाग 17 काम घेतले पण सातत्य 11 गावांनीच ठेवले या स्पर्धेत लोकसहभाग, श्रमदानातून 25515 यांत्रीक पद्धतीने 711574 असे 767089 घनमीटर काम होवून 74 कोटी 15 लाखाचा पाणीसाठा निर्माण करण्याची क्षमता झाली. शासकिय मुल्यांकनाने या कामांची किंमत 50 कोटी रूपये इतकी होते. मात्र हे काम केवळ 45 दिवसांत पूर्ण झाले. यासाठी लोकसहभाग, प्रशासकिय अधिकारी, कर्मचार्‍यांचा सहभाग,वारी परिवार,दामाजी महाविदयालय,पंतजली,बार असोशियन,राष्ट्रवादी कॉगे्रस,पोलीस अधिकारी,धनश्री परिवार,माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे,खा.शरद बनसोडे,आ भारत भालके,रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड,तहसीलदार आप्पासाहेब समींदर, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार जाधव,कृषी अधिकारी नामदेव गायकवाड,यांचे प्रोत्साहन व थेट सहभाग, भारतीय जैन संघटनेच्या आर्थीक पाठबळामुळे तालुक्यात एवढया मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे उभी राहीली.सहभागी गावाने जलयुक्त शिवारात राबविलेले सलगसमतल चर, कंट्रोल बल्डींग, शेततळे, शेती -बांद,नाला बंदीस्त , पाणलोट साठवण तलाव, ओढा खोलीकरण, रुंदीकरण, रोपवाटीका, शिव व शिवारात पावसाने वाहून पाणी अडवण्यासाठी दगडांची बंधारे, मुरूम - माती बंधारे आदी कामे सहभागी गावातील ग्रामस्थांनी श्रमदान, लोकसभागाने ऐक्य जपत कायम पाण्यासाठी केलेला निर्धार सार्थ ठरला.बक्षीस स्विकारल्यानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. या स्पर्धेसाठी जिल्हा समन्व्यक सत्यवान देशमुख,तालुका समन्वयक श्रीनिवास गंगणे,जितेंद्र गडहिरे,वैभव इंगळे,वैभव जगदाळे, यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

आ.भारत भालके,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,भारतीय जैन संघटना,ग्रामस्थांनी व सकाळनी केलेल्या सहकार्याने या स्पर्धेत 61889 घनमिटरचे काम केल्यामुळे आम्हाला यश मिळाले असले ताळेबंद जुळवण्यामध्ये माहिती अभावामुळे राज्यात येण्याची संधी हुकल्याची खंत वाटते  कलावती आसबे सरपंच आसबेवाडी

Web Title: water cup competition asbewadi first