Video : पुणे-बंगळूर महामार्गावरील पाणी लागले ओसरायला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

महापूराच्या पाण्यामुळे तिसऱ्या दिवशी महामार्ग बंद आहे. वाहतूक ठप्पच असून, दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाले आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस रात्रंदिवस महामार्गावर बॅरिकेट लावून पहारा देत आहेत. 

शिरोली पुलाची (सांगली) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाट्याजवळ आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी संथ गतीने कमी होत आहे. काल रात्रीपासून पाणी पातळी साधारणतः एक फूटाने कमी झाल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

महापूराच्या पाण्यामुळे तिसऱ्या दिवशी महामार्ग बंद आहे. वाहतूक ठप्पच असून, दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाले आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस रात्रंदिवस महामार्गावर बॅरिकेट लावून पहारा देत आहेत. 

राष्ट्रीय महामार्ग ठप्प होऊन तिसरा दिवस उजाडला. रस्त्यारून वाहणारे पाणी संथ गतीने कमी होत आहे. सांगली फाटा ते तावडे हॉटेलपर्यंतचा महामार्ग पाण्याखाली असून, पाण्याचा वेग प्रचंड आहे. पाण्याच्या वेगाने रस्ता खचला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी पूर्णतः गेल्या नंतर, रस्त्याची पाहणी करूनच वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी उतरत असली, तर महामार्गावरील वाहतूक लवकर सुरू होणे अशक्य आहे.

महामार्गालगतची फर्निचर शोरूम महापूराच्या पाण्यात बुडाली आहेत. यापैकी एक शोरूम पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची भिती बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी व्यक्त केली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water level decreases on Pune Banglore highway at Shiroli