साेलापूर : म्हैशाळच्या पाण्यावरून राजकारण

दावल इनामदार
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

साेलापूर येथील सहा गावाची म्हैशाळ योजना सध्या चर्चेत आहे. यावरून सध्या राजकारण पेटले आहे.  

ब्रह्मपुरी (सोलापूर) : येत्या काही दिवसांवर  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पाण्यासाठी राजकीय वातावरण तापले असून, जो तो आपल्या परीने श्रेय घेण्यासाठी मतदार राजासाठी आकर्षित करू लागला आहे.

दरम्यान, पंढरपूर विधानसभा मतदार संघात गेली दहा वर्षांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावच्या पाण्यावरून राजकारण चालले आहे. परंतु अजून कोणत्याही राजकीय नेत्याची पक्षातून उमेदवारी जाहीर झाली नसली तरी सर्वच उमेदवार गावनिहाय गाठीभेटी जोर देत असून, मंगळवेढा विधानसभा मतदार संघात मतदारांची चाचपणी करीत आहे. काॅग्रेस पक्षाचे सत्ताधारी आमदार भारत भालके यांनी काॅग्रेस पक्षाशी फारकत घेऊन मोठे शक्तिप्रदर्शन केले. 'जनता हाच माझा पक्ष' म्हणून भालके गटाची ताकद दाखवून विरोधकांमध्ये सस्पेंस ठेवला आहे.

२००९ पासून  विधानसभा मतदार संघात आपल्या मतदारसंघातील  पाण्याच्या संघर्षला आमदारकी पणाला लावली असून तालुक्यातील ४५ गावाला पाणी  मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे भूमिका घेतली आहे. मंगळवेढा तालुक्यातील काही गावे पाण्या साठी वंचित राहिली होती, त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीने पाठपुरावा केला असून, प्रत्येकजण वंचित राहिलेल्या सहा ते आठ गावांची श्रेय घेण्यासाठी विविध माध्यमातून सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप, शासकीय आदेश यांच्याप्रती झळकू लागले आहेत.भाजपचे सहयोगी विधानपरिषद् आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर अर्बन बँक मंगलवेढा येथे पत्रकार परिषद घेऊन वंचित असलेल्या सहा गावाची म्हैशाळ योजनेतून समविष्ठ झाल्याची प्रशासकीय पत्राची माहिती देण्यात आली.

पत्रकार परिषदेमध्ये आमदार परिचारक यांनी पाण्यासाठी वंचित राहिलेल्या गावाची श्रेय त्या गावाच्या जनतेचे असून, मी फक्त निमित्त आहे, असे ठासून सांगितले. काहीही झाले तरी आपणही  पंढरपुर विधानसभा मतदारसंघात उभारनार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तसेच शिवसेनेच्या पंढरपूर विधानसभेचे दावेदार जिल्हा परिषद सदस्य शैलाताई गोडसे यांनी पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी आसबेवाडी, सोड्डी,  लवंगी, येळगी, सलगर बु, सलगर खुर्द हुलजंती या आठ गावांचा समावेश म्हैसाळ योजनेत करण्यास राज्य शासनाने तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी दिल़ी.

यासाठी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी विशेष सहकार्य केले असून योजना मंजुरी साठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नाने यास मंजुरी मिळाली. शैला गोडसे यांनी या गावांचा समावेश म्हैसाळ योजनेत व्हावा यासाठी शेतकर्यांना बरोबर घेवून आंदोलन उभारले होते. त्यांच्यामुळेच पाठपुराव्याला आता यश आले आहे. या योजनेमुळे तालुक्यातील म्हैशाळ योजनेचा लाभ 774 हेक्टर शेतीला होणार आहे. जो तो आपल्या परीने पाण्यासाठी राजकीय श्रेय घेत असून तालुक्यातील जनतेला पाणी मिळणे महत्त्वाचे आहे तरी येणारी विधानसभा निवडणूक ही सर्व राजकीय पक्षासाठी अटीतटीची असून अजूनही तालुक्यातील राजकारण पाण्याभोवती फिरु लागले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक 'कोणाला तारनार कोणाला मारनार' निकालाच्या मतपेटीतुनच  दिसून येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water politics in Maishal