सोलापूर - मोहोळ मधील पिरटाकळीत बसवली जलशुद्धीकरण यंत्रणा

राजकुमार शहा 
गुरुवार, 10 मे 2018

मोहोळ (सोलापूर) : आपल्याला अनेक आजार हे पाण्यामुळे होतात त्यामुळे शुद्ध पाणी प्यायल्याने आजार तरी कमी होतीलच पण दवाखान्यासाठी होणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. पिरटाकळी ग्रामपंचायतीचा हा शुध्द पाण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी केले.

पिरटाकळी (ता. मोहोळ) येथील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांसाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविली आहे. त्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी येळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच कालिंदा धुमाळ होत्या या यंत्रणेद्वारे गावकऱ्यांना थंड व शुद्व पाणी पुरवठा केला जात आहे. या यंत्रणेसाठी सुमारे सव्वादोन लाख रुपये खर्च आला आहे पाच रुपयात आठरा लीटर पाण्याचा ग्रामस्थांना पुरवठा केला  जात आहे  दररोज गावाला तीन हजार लीटर पाण्याची आवश्यकता  आहे. 

यावेळी सभापती समता गावडे कामतीचे सरपंच रामराव भोसले  अशोक भोसले उपसरपंच पंचायत समिती सदस्य सुनीता भोसले  दिपक थीटे विस्तार अधिकारी संदीप खरबस नंदकिशोर बागवाले महेश धुमाळ ग्रामसेविका उज्वला उमाटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: water purify installed at pirtakli