Water Crisis : शिराळ्यातील 41 गावांत पाणीटंचाई घोषित; वाळव्यातील रेठरे धरण, कार्वे तलावात उपसाबंदी

वाळवा तालुक्यातील कार्वे व रेठरे धरण या तलावात उपसाबंदी जाहीर करण्यात आली आहे.
Water Shortage Shirala sangli
Water Shortage Shirala sangli esakal
Summary

घोषित भागामधील समाविष्ट गावामध्ये कृषी आणि औद्योगिक वापरासाठी मनाई करण्यात आली आहे.

पुनवत : शिराळा तालुक्यात ९२ ग्रामपंचायती असून त्यामधील ४१ वाड्या, वस्त्या व गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी घोषित केली. शासनाच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असल्याने टंचाईकाळात उपसाबंदी अगर विहीर विंधन विहीर अधिग्रहण केल्यामुळे पाण्याअभावी कोणत्याही व्यक्तीचे, पिकांचे अथवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास नुकसान भरपाईची मागणी करता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

पिण्याच्या पाण्याचा पाणी टंचाई कालावधी हा एक जलवर्ष कालावधीसाठी असणार आहे. याशिवाय, वाळवा तालुक्यातील कार्वे व रेठरे धरण या तलावात उपसाबंदी जाहीर करण्यात आली आहे. घोषित भागामधील समाविष्ट गावामध्ये कृषी आणि औद्योगिक वापरासाठी मनाई करण्यात आली आहे.

Water Shortage Shirala sangli
Kolhapur Lok Sabha : दोन दिवस आदीच सगळा 'कारभार' हुणार...; ज्याचं पटंलं त्यालाच मतदान 'करायचं ठरलंय'

तसेच ६० मीटरहून अधिक खोलीची विहीर, विंधन विहीर, कूपनलिका खोदण्यास मनाई केलेली आहे. टंचाईवर मात करण्यासाठी, तसेच यापुढील काळात सद्यःस्थितीत असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याकरिता ८४ हातपंप व १६ सार्वजनिक विहिरी सार्वजनिक उद्‌भव व शासकीय अनुदानातून घेण्यात आलेल्या विहिरी, विंधन विहिरी उद्‌भवातील पाण्याची पातळी व असलेला साठा जतन करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उद्‌भवालगत असल्याने खासगी उद्‌भव किंवा पाणीसाठे व नव्याने होणाऱ्या खोदकामास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Water Shortage Shirala sangli
Kolhapur Lok Sabha : काटाजोड फाईट, वातावरण लई टाईट... गावोगावी प्रचाराच्या गाड्या; पक्षांतर, ऊस दरावर वाद-प्रतिवाद

टंचाईग्रस्त गावे

सोनवडे (जळकेवाडी), आरळा (बेरडेवाडी), आरळा (येसलेवाडी), गुंडगेवाडी (करंगली), कोळेकरवाडी (मणदूर), सिद्धेश्वरबाडी (मणदूर), मिरुखेवाडी (मणदूर), जाधववाडी (मणदूर), सोनवडे (खोतवाडी), माळवाडी (सावंतवाडी), परीटकी वस्ती (सावंतवाडी), गवळेवाडी (कांबळेवाडी), प. त. शिराळा (कारंडेवाडी), मेणी (बौद्ध समाजवस्ती), करमाळे (यादव मळा), पुदेवाडी (बांबवडे), सावंतवाडी (सोनवडे), कोकणेवाडी (आरळा), दुरंदेवाडी, उबरवाडी (कुसाईवाडी), भांडूगळेवाडी (आरळा), चिंचेवाडी, खराळे, वाकाईवाडी, खेड, बेलदारवाडी, रेड, सावंतवाडी, भैरववाडी, शिवारवाडी, बांबवडे, प. त. शिराळा, करमाळे, भटवाडी, शिरशी, ढोलेवाडी,भाटशिरगाव, कापरी, इंग्रुळ, नाटोली, जांभळेवाडी, फकीरवाडी.

Water Shortage Shirala sangli
'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com