कोल्हापूर शहरात आजपासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

कोल्हापूर - बालिंगा येथे पाईपलाईन बदलणे, तसेच नागोजीराव पाटणकर हायस्कूलजवळ पाईपलाईनची गळती काढण्याच्या कामामुळे निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (ता. २१) तसेच मंगळवारी बंद राहणार आहे. 

कोल्हापूर - बालिंगा येथे पाईपलाईन बदलणे, तसेच नागोजीराव पाटणकर हायस्कूलजवळ पाईपलाईनची गळती काढण्याच्या कामामुळे निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (ता. २१) तसेच मंगळवारी बंद राहणार आहे. 

शहराचा जुना भाग बालिंगा उपसा केंद्रावर अवलंबून आहे. ए, सी,सह ई वॉर्डच्या काही भागाला टंचाई जाणवणार आहे. बालिंगा उपसा केंद्राजवळ नव्याने पाईपलाईन टाकली जाणार आहे. पाटणकर हायस्कूलजवळील पाईपलाईनला गळती असल्याने तीही बदलली जाणार आहेत. दोन्ही कामांसाठी दोन दिवसांचा अवधी लागणार असल्याने पाणीपुरवठा खंडित होणार आहे. बुधवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टॅंकरची व्यवस्था केली आहे.

पाणी न येणारे भाग
फुलेवाडी, फुलेवाडी रिंगरोड, लक्षतीर्थ वसाहत, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, तलवार चौक, हरिओमनगर, शिवाजी पेठ, जुना वाशीनाका परिसर, सरनाईक कॉलनी, राजकपूर पुतळा परिसर, जाऊळाचा बालगणेश मंदिर परिसर, दुधाळी, गंगावेस, बुधवार पेठ तालीम परिसर, महापालिका परिसर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, आझाद चौक, मिरजकर तिकटी, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी पाचवी ते सातवी गल्ली, बागल चौक, बी. टी. कॉलेज.

Web Title: Water supply is closed for two days from today in Kolhapur city