रात्री पाणीपुरवठ्यामुळे सोलापूरकरांचे जागरण

water
water

सोलापूर : उजनी योजनेवर अवलंबून असलेल्या परिसराला मंगळवारी रात्री ९ नंतर पाणीपुरवठा झाला. त्यामुळे  पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील नागरिकांचे जागरण झाले. सहाव्या दिवशी तेही रात्री पाणी आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

उजनी जलवाहिनीला टेंभुर्णीजवळ गळती झाल्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या परिसराला   रात्री पाणीपुरवठा झाला.  त्यामुळे बुधवारच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले  आहे. 

उजनी ते सोलापूर दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीला सोमवारी सायंकाळी सहा वाजता टेंभुर्णी परिसरातील वेणेगावच्या पुढे मोठी गळती झाली. ती दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी कालावधी लागला. मंगळवारी दुपारनंतर पंप सुरु करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता पाकणीला पाणी पोचले.

विस्कळित पाणीपुरवठ्याच्या कालावधीत नवीपेठ, मुल्लाबाबा टेकडी परिसर, रामलाल चौक परिसर, मल्लिकार्जुन मंदिर परिसर, जुनी मिल चाळ, रामलाल चौक परिसर, एन. जी. मिल चाळ, सेवासदन प्रशाला. बुधवार पेठ, बगलेवस्ती, रमाबाई आंबेडकरनगर, हनुमाननगर, सम्राट चौक परिसर, पंधे अपार्टमेंट, शाहीर वस्ती, प्रभाकर महाराज मंदिर परिसर, मंत्री चंडकनगर, वर्धमाननगर, तुळजापूर वेस परिसर, घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सातपुते वस्ती, जोडभावी पेठ, दयानंद कॉलेज परिसर, सिद्धेश्‍वर सोसायटी, श्रीशैलनगर, मडकी वस्ती, तुळजापूर वेस, बोरामणी तालीम परिसर, नेहरूनगर, सुंदरमनगर, अशोकनगर, सुशीलनगर, एस. टी. कॉलनी, साईनगर, विजयपूर रोडवरील 22 सोसायट्या, नालंदानगर, गणेशनगर, आदित्यनगर, विद्यानगर, मित्रनगर, शेळगी, दहिटणे परिसर, चाकोतेनगर, सन्मित्रनगर, अमरनाथनगर, विडी घरकुल, ए. बी. ग्रुप परिसराला उशिरा पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. 

या भागाला झाला रात्री पाणीपुरवठा 
केगाव, बाळे, लक्ष्मीनगर, संतोषनगर, इंदिरानगर, रामलिंगनगर, राजीवनगर, मरिआई चौक परिसर, देगाव रोड परिसर, सलगरवस्ती परिसर, यतिमखाना परिसर, रामवाडी, उत्तर कसबा, दक्षिण कसबा, काळी मशीद परिसर, सळई मारुती परिसर, अवंतीनगर, अभिषेकनगर, निराळे वस्ती, साठे चाळ, मोटे चाळ, उमानगरी, तरटीनाका परिसर, मुरारजी पेठ, शेटे वस्ती, देशमुख पाटील वस्ती, शेळगी व दहिटणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com