सुपे औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध - मुख्यमंत्री

supe
supe

पारनेर - देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम महाराष्ट्र राज्य करत आहे. सुपे औधोगिक वसाहतीत भयमुक्त औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यथे येणाऱ्या उद्योगांना पूर्ण सहकार्य करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुपे (नगर) येथील औद्योगिक वसाहतीत मिडिया कंपनीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते

यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी, शिवजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, मिडिया ग्रुपचे संस्थापक शिंगजियन अध्यक्ष पॉल फंग औधोगिक मंडळाचे पी. अन्बलगन उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले, येथे मिडिया सारखे अनेक उधोग येणार आहेत. त्यामुळे येथे अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. या पूर्वी जपानी उद्योजकांनी येथे येण्यासाठी तयारी दाखवली आहे. चिनी उद्योगही येत आहेत. मिडिया हा उद्योग 68 एकरात सुमारे 1350 कोटींची गुंतवणूक करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com