esakal | हम फिट तो अहमदनगर फिट... 
sakal

बोलून बातमी शोधा

 We fit Ahmednagar then fit

आज रविवार असूनदेखील भुईकोट किल्ल्याजवळील नगर क्‍लब परिसरात गर्दी झाली होती. धावणारे महिला, पुरुष, युवक-युवतींसह लहान मुले असे दृश्‍य मॅरेथॉननिमित्त पहायला मिळाले.

हम फिट तो अहमदनगर फिट... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : "हम फिट तो नगर फिट' असे सांगत आरोग्याचा जागर करत पहाटेच्या कडाक्‍याच्या थंडीत साडेतीन हजार स्पर्धक मॅक्‍सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये धावले. या मॅरेथॉनमधून आरोग्य व कर्करोगाविषयी जागृती करण्यात आली. नगर रायझिंग फाउंडेशन आयोजित व महाराष्ट्र ऍथेलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा झाली. 

चार गटात झाली स्पर्धा 
आज रविवार असूनदेखील भुईकोट किल्ल्याजवळील नगर क्‍लब परिसरात गर्दी झाली होती. धावणारे महिला, पुरुष, युवक-युवतींसह लहान मुले असे दृश्‍य मॅरेथॉननिमित्त पहायला मिळाले. अतिशय शिस्तबध्दरित्या आणि तितक्‍याच उत्साहात संपूर्ण मॅरेथॉन पार पडली. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर तसेच 3 व 5 किलोमीटर या चार गटात ही स्पर्धा झाली. 

दिग्गजांची उपस्थिती 
ऑलंपिक खेळाडू ललिता बाबर, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, छाया फिरोदिया, आशा फिरोदिया, रेखा सारडा, नगर रायझिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, स्पर्धा संयोजक संदीप जोशी, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. शाम तारडे, ऍड. गौरव मिरीकर, राज्य ऍथेलिटिक्‍स असोसिएशनचे सहायक सचिव दिनेश भालेराव आदींच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून चार गटातील मॅरेथॉन स्पर्धेची सुरवात करण्यात आली. 

गीतांनी वाढवला उत्साह 
झुंबा डान्सची धमाल रनर्सनी अनुभवली. आर्मीच्या बॅण्ड पथकासह विविध लावण्यात आलेल्या प्रेरक हिंदी गीतांनी रनर्सचा उत्साह वाढवला. मॅरेथॉनच्या प्रारंभी नगर रायझिंगचे गीत वाजविण्यात आले. काही महिला नऊवारी साडी परिधान करुन सहभागी झाल्या. तिरंगा ध्वज घेऊन आलेले रनर्स मॅरेथॉनचे आकर्षण ठरले. जगातील अतिशय खडतर मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे भारताचे रनर्स चंद्रकांत पाटील, मनोज देशपांडे, तुकाराम नाईक, सुरेंद्र ब्रम्हे, जस्मीत वधवा, चेतन नवलानी, मीना पोटे पेसर म्हणून सहभाग लाभला. 
स्पर्धेच्या समारोपनंतर नगर क्‍लबच्या मैदानावर लगेचच ऑलंपिक खेळाडू ललिता बाबरच्या हस्ते रनर्सना बक्षीस देण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी मॅरेथॉन स्पर्धेस भेट दिली. मॅरेथॉन नंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

स्पर्धेचा निकाल 
21 किलोमीटर पुरुष गट - प्रथम- चांगदेव लाटे (नगर), द्वितीय समित भूकेर (बीटीआर), तृतीय कार्तिक कुमार (बीटीआर), महिला - प्रथम- स्मिता उकिर्डे, द्वितीय- भारती यादव, तृतीय- अनिता बोथरा (तिन्ही रा. नगर) 
10 किलोमीटर पुरुष गट - प्रथम- किशोर मरकड (पाथर्डी), द्वितीय- महेंद्र कुमार, तृतीय- विशाल ढगे, महिला - प्रथम- जनाबाई हिरवे (सातारा), द्वितीय- शीतल भंडारी (पारनेर), तृतीय- नेहा खान (नगर). 
स्पर्धेचा अंतिम व संपूर्ण निकाल 15 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. 

लकी स्पर्धक 
यावेळी स्पर्धेतील रनर्सच्या चेस्ट नंबच्या आधारे लकी ड्रॉ काढण्यात आले. यामध्ये भाग्यवान विजेते ज्योतीराज शिंदे, उमेश व्यवहारे, ज्ञानेश्‍वर मोरे, ओम ढवळे, दीपा मोहळे, महेश घोडके, नवीन कुमार, जितेंद्र मराठे यांना सायकल बक्षीस देण्यात आले. 
 

loading image
go to top