बलवडीत मंत्र्यांचे 27 वर्षांनी स्वागत... गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

आळसंद (सांगली)-  बलवडी भा. (ता.खानापूर ) येथील एस. टी. स्टॅंड समोर पालकमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. श्री. पाटील यांचे स्वागत केल्याने तब्बल 27 वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्वागत व आठवणींना उजाळा मिळाला. 

सन 1995 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप शिवसेना युतीचे शासन सत्तेवर आले. सन 1997 मध्ये विटा शहराला मुबलक पाणी मिळावे, यासाठी लोकनेते हणमंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन नगराध्यक्ष सदाशिवराव पाटील यांच्या पुढाकाराने घोगाव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती. उद्घाटनप्रसंगी तत्कालीन उपमुख्यमंत्री मुंढे, तत्कालिन पाणी पुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे , सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक होते. मुंढे विट्याला जाताना बलवडीत थांबले. चंद्रकांत महादेव पवार, संपतराव गायकवाड, तारानाथ कुलकर्णी यांनी जंगी स्वागत केले होते.

सदाशिव पाटील यांनी बलवडीत थांबण्याची विनंती केली. त्याला आज सत्तावीस वर्षांचा काळ लोटला. पालकमंत्री पाटील यांच्या भेटीमागे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केलेल्या विनंतीमुळे पालकमंत्री श्री. पाटील हेही बलवडी येथे थांबले. मध्यंतरी, माजी मंत्री पतंगराव कदम राष्ट्रीय पेयजल योजनेच्या भूमीपूजनास आले होते. मात्र कदम हे एस. टी . स्टॅंडकडे न येता सरळ कार्यक्रम स्थळी आले होते. पालकमंत्री श्री. पाटील यांचे स्वागत केले. या घटनेमुळे तब्बल सत्तावीस वर्षांपूर्वी मुंढे यांच्या केलेल्या स्वागताला उजाळा मिळाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Welcome to Balwadi ministers after 27 years . memories of Gopinath Munde