ग्रामस्वच्छता अभियान पथकाचे अभूतपूर्व स्वागत

नागेश गायकवाड
बुधवार, 4 जुलै 2018

ग्रामस्वच्छता अभियान विभागीय स्पर्धा अंतर्गत यपावाडी (ता.आटपाडी) गावची आज पथकाने पाहणी केली. या पथकाचे ग्रामस्थांनी अभूतपूर्व जल्लोषात स्वागत केले.

आटपाडी- ग्रामस्वच्छता अभियान विभागीय स्पर्धा अंतर्गत यपावाडी (ता.आटपाडी) गावची आज पथकाने पाहणी केली. या पथकाचे ग्रामस्थांनी अभूतपूर्व जल्लोषात स्वागत केले.

स्वच्छता अभियानात यपावाडी गावाचा जिल्हास्तरीय स्पधेॅ प्रथम क्रमांक मिळाला होता.यानंतर गेली महिनाभर ग्रामस्थ आणी खासकरून तरूणवर्गाने विभागीय स्पधेॅसाठी कंबर कसली होती. विभागीय स्पर्धेसाठी आज पथकाने पाहणी केली. या पथकाचे गावाबाहेर च जोरदार स्वागत केले.

पथकातील अधिकारयाना सजवलेल्या बैलगाडीतून वादयाच्या गजरात गावात आणले. गावातून मिरवणूक काढली. ग्राग्रामस्थांनी जागोजागोजागी सडा आणी रांगोळी  काढली होती. गावची रंगरंगोटी केली होती. नव्या नवरीसारखे गागाव नटले होते. गावाला उत्सवाचे स्वरूप आले होते. यावेळी सरपंच माजी सरपंच टी.ए.चव्हाण, अजित चव्हाण, विष्णुपंत चव्हाण, राजेश नांगरे, राजेश चव्हाण, प्रा.सदाशिव मोरे आदी ग्रामस्थ, तरूण आणि महिला उपस्थित होत्या.

Web Title: welcoming gram swachhata abhiyan squad