दोन हजारांच्या नोटेचे करायचे काय?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - पाचशे व हजाराच्या रद्द केलेल्या नोटा जमा करून घेऊन नागरिकांना नव्या काढलेल्या दोन हजारांच्या नोटांचे वितरण होत आहे.

पण नवीन पाचशेची नोट अद्याप बाजारात आलेली नाही आणि शंभर व पन्नास रुपयांच्या पुरेशा नोटा नसल्यामुळे या दोन हजार रुपयांच्या नोटेचे करायचे काय, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

कोल्हापूर - पाचशे व हजाराच्या रद्द केलेल्या नोटा जमा करून घेऊन नागरिकांना नव्या काढलेल्या दोन हजारांच्या नोटांचे वितरण होत आहे.

पण नवीन पाचशेची नोट अद्याप बाजारात आलेली नाही आणि शंभर व पन्नास रुपयांच्या पुरेशा नोटा नसल्यामुळे या दोन हजार रुपयांच्या नोटेचे करायचे काय, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर त्या जमा करण्याचे काम चार दिवसांपासून सुरू आहे. त्याच्या बदल्यात बॅंकांकडून उपलब्ध असेल त्यानुसार रक्‍कम दिली जाते. पहिल्या दोन दिवसांत बहुतांश बॅंकांकडील शंभर रुपयांच्या नोटा संपल्या. दरम्यानच्या काळात शासनाने नवीन काढलेल्या दोन हजारांच्या नोटा बॅंकांना मिळाल्यानंतर त्यांचे वितरण बॅंकांनी सुरू केले. पाचशे व हजाराच्या नोटा जमा करून लोक दोन हजारांच्या नोटा घेऊन बॅंकेतून येऊ लागले; पण बाजारात या नोटेचे करायचे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पाचशे रुपयांच्या नवीन नोटा अद्याप रिझर्व्ह बॅंकेकडून आलेल्या नाहीत. सध्याच्या पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. शंभर रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाणच कमी आहे. चलनातील पाचशे व हजाराच्या नोटा साधारणपणे 83 टक्‍के असल्याचे सांगण्यात येते. राहिलेल्यांमध्ये शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.

या नोटा मुळातच चलनात कमी आहेत. अशा परिस्थितीत पाचशे, हजाराची नोट रद्द करून सरकारने थेट दोन हजार रुपयांची नोट काढली आहे. रद्द केलेल्या पाचशे व हजाराच्या नोटा जमा करून नवीन नोटा घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दोन हजारांच्या नवीन नोटा दिल्या जातात. नवीन दोन हजारांची नोट हातात पडल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते.

ही रक्‍कम घेऊन जेव्हा तो बाजारात जातो तेव्हा मात्र त्याचा भ्रमनिरास होतो. पाचशे रुपयांची वस्तू घेतली आणि दुकानदाराला दोन हजार रुपयांची नवीन नोट दिली तर दुकानदार ही नोट घेण्यास नकार देतो. अडवणूक करण्याच्या उद्देशाने हा नकार नसतो, तर दुकानदाराचाही नाइलाज असतो. कारण पाचशेच्या नोटा सध्या बाजारात उपलब्ध नाहीत. शंभराच्या, पन्नासच्या नोटा कमी आहेत. त्यामुळे दुकानदाराकडे दीड हजार रुपये देण्यासाठी रक्‍कमच नसल्याने दुकानदाराला नकार देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Web Title: What do the two thousand currency?