व्हॉट्‌सऍप ग्रुप ऍडमिनसह दोघांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

सोलापूर - एस. के. कंपनी नावाच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याप्रकरणी ग्रुप ऍडमिनसह दोघांना सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे. दोघांची मंगळवारी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सोलापूर - एस. के. कंपनी नावाच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याप्रकरणी ग्रुप ऍडमिनसह दोघांना सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे. दोघांची मंगळवारी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

शैलेश रमेश निचळे (वय 26, रा. शानदार चौक, सोलापूर तालुका पोलिस ठाणे परिसर. हल्ली- कापसे गल्ली, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या तरुणाचे नाव आहे तर सुशील शिवाजी कदम (वय 21, रा. पांडुरंग गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) हा एस. के. कंपनी ग्रुपचा ऍडमिन आहे. तणाव निर्माण होईल असा आणि महिलांबाबत अश्‍लील टिप्पणी असलेला मजकूर निचळे याने व्हॉट्‌सऍपवर शेअर केला. याप्रकरणी ऍडमिन सुशील कदम याला कल्पना देऊनही त्याने काहीच केले नाही. ग्रुपवरील सदस्याने

दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणात सरकारतर्फे ऍड. संतोष पाटील तर आरोपींच्या वतीने ऍड. राजकुमार फताटे हे काम पाहत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप करीत आहेत.\

एस. के. कंपनीवर शेअर केलेल्या मेसेजमुळे तणाव निर्माण होऊ शकला असता. पोलिसांनी वेळीच कारवाई करून ऍडमिनसह दोघांना अटक केली आहे. सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनी दक्षता घ्यायला हवी. फेसबुक, व्हॉट्‌सऍपसह इतर सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्रे शेअर करू नका. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अटक करून कारवाई केली जाते.
- संजय जगताप, पोलिस निरीक्षक

Web Title: WhatsApp Group Admin arrested