अनुदानाचे 'सिंचन' कधी?; 836 लाभार्थी प्रतीक्षेत

दरवर्षी केवळ 150 ते 200 हेक्टरात योजना ; निधी वाढविण्याची गरज
अनुदानाचे 'सिंचन' कधी?; 836 लाभार्थी प्रतीक्षेत

मांजरी : चिक्कोडी तालुक्यात कृषी खात्याकडे ठिबक सिंचन व स्पिंकलर या सिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात येत आहेत. पण निधीची कमतरता असल्यामुळे सन 2017 ते 2020 या तीन वर्षाच्या काळात एकूण 836 शेतकरी सिंचन योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये ठिबक सिंचन योजनेसाठी 386 तर स्पिंकलर योजनेसाठी 450 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

ठिबक सिंचनामुळे कमी पाण्यावर अधिक क्षेत्रांमध्ये पिके घेता येतात. शिवाय अनेक खर्च वाचविण्यात शेतकऱ्यांना यश मिळते. यासाठी ठिबक सिंचन योजना सर्व शेतकऱ्यांनी राबवणे आवश्यक आहे. सध्या पाटाच्या पाण्यावर वापरात असलेल्या पाण्याच्या प्रमाणात 30 ते 40 टक्के पाण्याची बचत होते. तेच पाणी व उर्वरित क्षेत्राला देता येणे शक्य आहे. ठिबक सिंचनमुळे 20 ते 75 टक्के विजेची बचत होते. तसेच पाण्याच्या अतिरेकी वापराने क्षारपड झालेल्या जमिनींची सुपीकता टिकविण्यास मदत होते. ठिबक सिंचनमुळे कमी मनुष्यबळावर अधिक क्षेत्रावर पाण्याचे नियोजन करता येते.

16 ते 95 टक्के पिकांच्या गुणवत्तेत व उत्पादनामध्ये वाढ होते. पन्नास टक्के तण नियंत्रणात राहते. 20 ते 40 टक्के खते, किटक नाशके, औषधांची बचत होते. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांचा ठिबक सिंचनकडे कल वाढत आहे. पण कृषी खात्याकडून यासाठी म्हणावा तेवढा निधी दिला जात नाही. वर्षाकाठी निश्चित अशी रक्कम देण्यात येते. त्यामुळे ज्येष्ठता यादीनुसार त्यातील वर्षाला 150 ते 200 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. लहान व अती लहान तसेच एससी, एसटी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साठी 90 टक्के सवलत असल्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचे प्रमाण वाढत आहे. पण 95 हजार हेक्टर शेती क्षेत्र असलेल्या चिक्कोडी तालुक्यात दरवर्षी केवळ 150 ते 200 हेक्टरमध्येच ही योजना राबविण्यात येत आहे. निपाणी, चिक्कोडी व सदलगा भागातील बहुतांश शेतकरी ठिबकचा वापर करीत आहेत. याबाबत अधिक जागृती करून दरवर्षी अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यासाठी कृषी खात्याने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

दीड-दोन कोटी रुपयांचा निधी

दरवर्षी कृषी खात्याला दीड ते दोन कोटी रुपयाचा निधी ठिबक सिंचन योजनांच्या सबसिडीसाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेकडो लाभार्थी शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून या योजनेच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. परिणामी जादा निधीची गरज व्यक्त होत आहे.

चिक्कोडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर पाइप व जलसिंचनासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले सदर प्रस्ताव कृषी खात्यामार्फत राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे मात्र सध्या कोरोना व इतर कारणांमुळे सदर योजनेला स्थगिती मिळाल्याने अनेक शेतकरी

-मंजुनाथ जनमट्टी,

कृषी अधिकारी, चिक्कोडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com