अखेर शेख याने तो बांगलादेशातील ढाका येथील असल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्यातील कागदपत्रांच्या फोटोवरून तो बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले.
सांगली : भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकाने (Bangladeshi Citizen) सांगली का निवडली, याच्या उत्तराने पोलिसही चक्रावले आहे. पुण्या-मुंबईत राहण्याची इच्छा होती. मात्र महागाई अधिक असल्याने त्या तुलनेत सांगलीत खर्च कमी असल्याची माहिती त्याला मिळाली. म्हणून त्याने सांगली निवडली आणि तो एसटीने (ST) आल्याचे तपासात समोर आले आहे.