सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये? - विखे
राहाता - 'नोटाबंदीमुळे राज्यात बळींची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये,'' असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केला.
विखे पाटील म्हणाले, 'विरोधी पक्षात असताना फडणवीस व मुनगंटीवार अशीच मागणी करायचे. आता त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाइकांकडे नव्या नोटांचा आग्रह धरला. धनादेशही स्वीकारला नाही. त्यात नवजात बालकाचा मृत्यू झाला. या रुग्णालयाची मान्यता रद्द करावी.''

'नागपूर जिल्ह्यातील स्टेट बॅंकेचे कर्मचारी अनंत बापट यांनी नोटाबंदीमुळे आत्महत्या केली. बळींची संख्या दररोज वाढत चालल्याने मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,'' असेही विखे पाटील म्हणाले.