सुशीलकुमार शिंदेंनाही 'का' वाटली काळजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

आव्हानात्मक निवडणुकीतही मिळाले यश
प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते. यंदाची निवडणुकही आव्हानात्मक होती. या निवडणुकीत यंदा एक चांगला अनुभव आला. मतदारांनी जात, पात, धर्म, वंश यांना प्राधान्य न देता कौल दिला आणि मला निवडून दिले.
- प्रणिती शिंदे, आमदार
सोलापूर शहर मध्य मतदारसंघ

सोलापूर ः सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मी निवडून येऊ नये अशी अनेकांची ईच्छा होती, तसे प्रयत्नही झाले. त्यामुळे बाबा (सुशीलकुमार शिंदे) काळजीत होतेच. मात्र एका वेगळ्या कारणांनी त्यांची चिंता वाढली होती आणि ते कारण होते या मतदारसंघातून मी तिसऱ्यांदा निवडणूक लढवित असल्याचे. या मतदारसंघातून सलग तीनदा कुणीच निवडून आले नाही, त्याची काळजी त्यांना फार होती, मात्र माझ्या विजयामुळे ते चिंतामुक्त झाले, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिलेल्या वार्तालाप कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या कालावधीत झालेल्या विविध घटनांच्या माहितींचा उहापोह केला. मतदारसंघातून मला मिळणारा मतदारांचा आधार हेच माझ्या यशाचे संकेत होते, त्यामुळे चिंतेत असलेल्या सर्वांना मीच धीर दिला आणि यशस्वीही झाले, असे त्यांनी सांगितले.

अहो आश्चर्यम म्हणत महापालिकेची सभा केली तहकूब

स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा
महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडविला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सोलापूर शहर हे "वाट' लावलेली सिटी झाली आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असूनही महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना शहर विकासासाठी पुरेसा निधी आणता आलेला नाही. स्मार्ट सिटीचा कारभार अतिशय भोंगळ पद्धतीने सुरु आहे. अनेक कामे निकृष्ट झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ही कामे तपासणीची गरज आहे. शहर विकासासाठी आता जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले. 

ही बस करतेय कौशल्याचा जागर 

वाय-फाय लावल्याने विकास होत नाही
हाय-फाय आणि वाय-फाय लावून शहराचा विकास होत नाही. मुलभूत सुविधा देणे आवश्‍यक आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची ईच्छा शक्ती नसल्यानेच सोलापूरच्या विकासाला खीळ बसली आहे. स्मार्ट सोलापूरकरांना रोज पाणी मिळावे, रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. पाण्याच्या प्रश्‍नावर सुद्धा महापालिकेतील सत्ताधारी एकत्रित येत नाहीत हे सोलापूरकरांचे दुर्देव आहे, असेही आमदार शिंदे म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why Sushilkumar Shinde also in worried