चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नगर - चारित्र्याच्या संशयावरून विळद (ता. नगर) येथे एकाने डोक्‍यात पाटा घालून आज पहाटे पत्नीचा खून केला. त्यानंतर आरोपी पती स्वत:हून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाला. स्वाती प्रवीण गडाप्पे (वय 33) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आरोपी प्रवीण ऊर्फ अप्पा गोपाळ गडाप्पे (वय 36, रा. विळद) यास पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास 10 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. स्वाती व प्रवीण या दोघांचाही पुनर्विवाह झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

Web Title: Wife murder on character suspicion in nagar