वन्यप्राण्यांच्या मदतीला निसर्गप्रेमी धावले

बार्डी (ता. पंढरपूर) - येथील वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडताना पुण्यातील वन्यप्रेमी.
बार्डी (ता. पंढरपूर) - येथील वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडताना पुण्यातील वन्यप्रेमी.

करकंब (जि. सोलापूर) - वार रविवार... वेळ दुपारी बारा-सव्वाबाराची... स्थळ बार्डीचे वन... पुण्यातून पाच निसर्गप्रेमींचे आगमन... सोबत मक्‍याच्या हिरव्या चाऱ्याचा ट्रॅक्‍टर व पाण्याचा टॅंकर... मदतीला वनविभागाचे कर्मचारी... पानझड झालेल्या जंगलात सावलीसाठी तरसलेल्या आणि भुकेने व्याकूळ झालेल्या वनगाईंच्या आशाळभूत नजरा हिरव्या चाऱ्याकडे लागलेल्या... एरवी मनुष्यप्राण्यास पाहून सावध भूमिका घेणाऱ्या वनगाईंची चारा टाकताच त्याकडे धाव घेतली... सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत असे आशादायी चित्र आज बार्डी (ता. पंढरपूर) येथील वनात पाहावयास मिळाले. 

मंगळवारी (ता. १४) ‘सकाळ’मध्ये ‘बार्डीतील वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्‍यात’ ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आज पुण्यातील निसर्गप्रेमी नागरिकांनी ‘सकाळ’च्या मदतीने येथील वन्यप्राण्यांच्या चारा-पाण्याची सोय केली. आज बार्डी येथील वनातील जलकुंभामध्ये १२ हजार लिटर पाणी सोडण्यात आले.

शिवाय तीन गुंठे मक्‍याचा हिरवा चाराही त्यांनी जंगलात टाकला. यामुळे किमान पुढील तीन दिवस तरी वन्यप्राण्यांच्या चारा-पाण्याची सोय झाली आहे. त्यानंतरचेही नियोजन या निसर्गप्रेमींनी केले असून अन्य काही साथीदारांना सोबत घेऊन पुढील दोन महिने वन्यप्राण्यांची उपासमार होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com