शिकारी कुत्र्याला ग्रामस्थांनी ठार मारले, 19 जणांना कुत्र्याने केले जखमी

विलास कुलकर्णी
बुधवार, 28 मार्च 2018

राहुरी फॅक्‍टरी (नगर) : तीन दिवसांपासून परिसरातील चार गावांत धुमाकुळ घालून तब्बल एकोणावीस जणांवर हल्ला करणाऱ्या शिकारी कुत्र्याला आज अखेर ग्रामस्थांनी पाठलाग करुन ठार केले. आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास गणेगांव-चिंचविहीरे दरम्यान ग्रामस्थांनी ही मोहीम राबविली. त्यामुळे अनेक गावांमधील दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांनी आज सुटकेचा श्वास सोडला. 

रविवारी (ता. 25) दुपारी दोन वाजेपासून या कुत्र्याने राहुरी फॅक्‍टरी, गुहा, गणेगांव, चिंचविहीरे व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर धुमाकूळ घातला होता. त्याच्या हल्ल्यात काल सायंकाळपर्यंत तब्बल एकोणावीस जण जखमी झाले. त्यातील काही जखमींवर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट व जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील अवघ्या दोघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यातही एक महिला गंभीर जखमी झालेली असून, तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुत्र्याने मुख्यत्वे नागरिकांच्या पायाची पोटरी, हात व पोटावरील मांसाचे अक्षरश: तुकडे तोडले आहेत. 

परिसरातील नागरिकांची काही पथके कुत्र्याचा शोध घेत होती. आज (बुधवारी) सकाळी आठ वाजता वाबळेवस्ती (गुहा) ते गणेगांव दरम्यान दुचाकीच्या एका पथकाला हे कुत्रे दिसले. त्यांनी तत्काळ कुत्र्याचा पाठलाग सुरु केला. तसेच अन्य गावांमधील लोकांना त्याची माहिती दिली. त्यामुळे पन्नास दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग केला. पंधरा किलोमीटर पाठलाग केल्यानंतर दमल्याने कुत्र्याचा वेग कमी झाला. त्यानंतर काठ्या, कुऱ्हाडी व कोयत्याने वार करुन कुत्र्याला ग्रामस्थांनी ठार केले. देवळाली प्रवरासह चारही गांवामधील ग्रामस्थ कुत्र्याचा पाठलाग करत होते. 

Web Title: wild dog killed by villagers, 19 villagers injured by him