मनप्रसन्न करणारे फ्लेमिंगो, चपळाई दाखविणारा काळवीट..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

सोलापूर : मनप्रसन्न करणारे फ्लेमिंगो, मोर, किंगफिशर, हुदहुद.., चपळाई दाखविणारे काळवीट, खोकड.., शिकार शोधणारा वाघ, कोल्हा अन्‌ लांडगा यासह अनेक पशु-पक्षी आणि निसर्ग छायाचित्रे सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. डॉ. मेतन फाउंडेशनच्यावतीने सोलापुरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग आणि वन्यजीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनाला गुरवारपासून सुरवात झाली. हे प्रदर्शन डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहाच्या गॅलरीमध्ये 27 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. 

महापौर शोभा बनशेट्टी, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनअधिकारी सुवर्णा माने यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. पक्ष्यांचे नंदनवन अशी सोलापूरची ओळख निर्माण व्हावी तसेच नागरिकांमध्ये निसर्गाबद्दल जागरूकता, प्राणी आणि पक्ष्यांबद्दल आवड, पृथ्वी मातेचे सरंक्षण याबाबत प्रबोधन करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजिले असल्याचे डॉ. व्यंकटेश मेतन यांनी प्रास्ताविकेत सांगितले. उपस्थितांचे स्वागत वीणा मेतन, गिरीष मेतन, राघवेंद्र मेतन, चिदानंद मुस्तारे यांनी केले. सूत्रसंचालन अंजली शिरसी यांनी केले. सोमेश्‍वर लवंगे यांनी आभार मानले. 

याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सुत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक बी.एस.कुलकर्णी, डॉ. निनाद शहा, सिद्धाराम पुराणिक, इंडियन मेडीकल असोसिएशन सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. ज्योती चिडगुपकर, युगंधर फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा. रेश्‍मा माने, ऍड. जे.जे.कुलकर्णी, लायन्स क्‍लबच्या मिनाक्षी पाचकवडे, इनरव्हील क्‍लब ऑफ हारमनीच्या अर्चना जाजू, ज्योती भंडारे, दत्ता गायकवाड, राजेंद्र शहा, इको फ्रेंडली क्‍लबचे कार्याध्यक्ष भाऊराव भोसले, शैक्षणिक समन्वयक संजीवकुमार कलशेट्टी, फोटोगाफर असोसिएशनचे अंबादास लोकम, महेश बनसोडे, युथ होस्टेल असोसिएशनचे इसाक तांबोळी, सिद्धेश्‍वर प्रशाला माजी विद्यार्थी संघटनेचे श्रीपाद वेणेगुरकर उपस्थित होते. 

- प्रदर्शनातून "निसर्गाशी नाते जुळवा'चा संदेश 
- गॅलरीमध्ये 90 छायाचित्रांचा समावेश 
- 25 टक्के छायाचित्रे सोलापूर परिसरातील 
- रविवारपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 सर्वांसाठी खुले 

निसर्ग संवर्धनासाठी साऱ्यांनीच प्रयत्न करावेत. डॉ. व्यंकटेश मेतन यांनी छायाचित्रांमधून निसर्ग सुदंररित्या मांडला आहे. सोलापूर विद्यापीठात जूनपासून फोटोग्राफीविषयीचे प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे. 
- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु, सोलापूर विद्यापीठ

Web Title: wild life photography exhibition starts at solapur