esakal | ...तर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार  : जयंत पाटील यांचा इशारा 

बोलून बातमी शोधा

Will file complaint against the illusionists jayant patil

कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर खालच्या पातळीचे राजकारण करू नका, असा इशाराही जयंत पाटील यांनी फेसबुकद्वारे दिला आहे.

...तर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार  : जयंत पाटील यांचा इशारा 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर - इस्लापूरातील कोरोनाबाधित कुटुंबीय इस्लामपूरात कधी दाखल झाले याची मला कल्पनाही नाही. त्यांच्या टेस्ट ज्यावेळी पॉझिटीव्ह निघाल्या तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी इस्लामपूरात ४ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे मला कळवले. माझ्याविरोधातील काही स्थानिक राजकारण्यांना घेऊन मला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

व्होक लिबरल या ट्विटर हँडलवरून कालपासून जयंत पाटील यांच्याविरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यावर जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

हे पण वाचा - Video:कोरोना रोखण्यासाठी आवाहन करताना, महिला सरपंचांना कोसळले रडू

कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर खालच्या पातळीचे राजकारण करू नका, असा इशाराही जयंत पाटील यांनी फेसबुकद्वारे दिला आहे. कोरोनाबाधीत कुटुंबियांसाठी मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला नाही. कोरोनाबाधित सर्व रुग्णांवर मिरजेत उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वॉरनटाईन केले गेले आहे. प्रशासनाला कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कुणालाही कोणतीही मूभा दिली गेलेली नाही. आम्ही सुरुवातीपासूनच लॉकडाऊनच्या समर्थनार्थ आहोत. राज्यात सर्वात आधी प्राथमिक शाळा व अंगणवाड्या सांगली जिल्ह्यात बंद केल्या गेल्या. आजही आम्ही काळजी घेत आहोत. खालच्या पातळीचे राजकारण करू नये. समाजात चुकीची माहिती पसरवून संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरोधात मी तक्रार दाखल करणार आहे.'

हे पण वाचा -  ब्रेकिंग - बंदी आदेश मोडून नमाज पठण ; 25 जणांना अटक